शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा दि. २४ डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 16:34 IST

गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आता दि. २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यादिवशी येथून एअर डेक्कन कंपनीच्या विमानाचे उड्डाण होणार आहे. कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी असणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देकोल्हापुरातून विमानाचे २४ डिसेंबरपासून उड्डाणसंभाजीराजे यांची माहिती; मंगळवार, बुधवार, रविवारी सेवातिकीटाची नोंदणी गुरुवारपासून

कोल्हापूर : गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आता दि. २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यादिवशी येथून एअर डेक्कन कंपनीच्या विमानाचे उड्डाण होणार आहे. कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी असणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दिली.

नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांची खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी सकाळी दिल्ली येथे भेट घेतली. उडाण योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट (वेळ) या कारणास्तव विमानसेवा सुरु होण्यास विलंब होत होता. याच संदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीपासून ही सेवा सुरु होण्यासाठी मुंबई, दिल्ली येथे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता.

गेल्या आठवड्यात त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली होती. दि. २५ व २६ आॅक्टोबर रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालयाच्या संयुक्त पथकाने कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली होती. या पाहणीचा अहवाल सादर झाल्यानंतर डीजीसीएने कोल्हापूर विमानतळाला प्रवासी वाहतूक परवाना दिला आहे.

दि. २४ डिसेंबरपासून कोल्हापूर- मुंबई विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन पूर्ण झाले असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील एका अधिकाऱ्यांने सांगितले असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. यानुसार एअर डेक्कनची ही विमानसेवा दर मंगळवार, बुधवार व रविवारी असणार आहे.

मुंबईवरून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापूरसाठी विमान उडान भरेल. दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी ते कोल्हापूरला पोहोचेल. याच दिवशी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी कोल्हापूर वरून हे विमान मुंबईसाठी उडान भरेल आणि दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी मुंबईला पोहोचेल अशी माहिती एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

कोल्हापूरला मोठा फायदाविमानसेवा सुरू होण्याबाबत केंद्रीयमंत्री अशोक गजपती राजू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण कोल्हापूर वासियांतर्फे आभार व्यक्त करतो, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले, उडाण योजनेमुळे कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून निश्चितपणे गुंतवणूक वाढेल. संपूर्ण महाराष्ट्राच्यादृष्टीने कोल्हापूर हे महत्वपूर्ण शहर असून विमानसेवेच्या प्रारंभामुळे कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फायदा होईल.

तिकीटाची नोंदणी गुरुवारपासूनएअर डेक्कनचे विमान हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. मुंबई-कोल्हापूर या विमानसेवेच्या तिकीटाची नोंदणी प्रवासी हे गुरुवारपासून करु शकतात, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती