'हवाई सफरी'चा समारोप

By Admin | Updated: January 20, 2015 23:48 IST2015-01-20T23:23:26+5:302015-01-20T23:48:51+5:30

एरोमॉडेलिंगचे वर्कशॉप : तीन दिवसांत तीन हजारांहून अधिकांची भेट

'Air Travel' concludes | 'हवाई सफरी'चा समारोप

'हवाई सफरी'चा समारोप

कोल्हापूर : डॉ़ व्ही़ टी़ पाटील स्मृतिभवन येथे गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे भरविण्यात आलेल्या ‘सफर विमानांची’ या प्रदर्शनाचा आज, मंगळवारी समारोप झाला. प्रदर्शनाला तीन दिवसांत तीन हजारांहून अधिक विद्यार्थी व पालकांनी भेट दिली. ‘विमाने बनवा, विमाने उडवा’ या एरोमॉडेलिंग वर्कशॉपचे आयोजनही करण्यात आले होते.
प्रदर्शनाचे प्रायोजक चाटे गु्रप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक शाहू दूध, तर सादरकर्ते पीबीसी’स अ‍ॅरो हब हे होते. विविध प्रकारच्या ऐंशी विमानांच्या प्रतिकृती, विमानक्षेत्राचा आतापर्यंतचा इतिहास अन् क्वॉडकॉप्टरचे डेमो ही या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये होती. विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरले, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. तसेच ‘लोकमत’ने असे विविधतापूर्ण प्रदर्शन भरविल्याबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत होते.
तीन दिवसांत दररोज विद्यार्थी-पालकांना ‘क्वॉडकॉप्टर’चे प्रात्यक्षिक दाखविण्यात येते होते. विद्यार्थ्यांना वैमानिक म्हणून करिअर करण्याच्या दृष्टीने दिशादर्शक ठरले. सायंकाळी झालेल्या एरोमॉडेलिंग वर्कशॉपमध्ये ४० जणांनी सहभाग घेतला होता.
यांचे विशेष सहकार्य लाभले
अण्णासाहेब डांगे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅँड टेक्नॉलॉजी, आष्टा येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी सलग तीन दिवस प्रदर्शनात उपस्थित राहून प्रदर्शनातील विमाने व त्यांसंबंधी सविस्तर माहिती देत होते. यामध्ये दीपक इंडे, तुषार लंबे, सचिन आहिरे, अक्षय पावले, हितेश्वर सूर्यवंशी, रणवीरसिंह आपटे, आकाश शेवळे, रामकृष्ण नेवसे, रेश्मा खाडे, श्वेता पाटील, प्रणाली कुलकर्णी, शुभम् बोरुडे, वैभव पाटील, ओमकार चौगुले, गणेश मलगुडे, तेजस माने यांचे विशेष सहकार्य लाभले. एरोनॉटिकलचे विभागप्रमुख राममूर्ती यांनी मार्गदर्शन केले.


विमानाबद्दल मला खूप आकर्षण आहे. हे प्रदर्शन पाहून मला विमानाची सर्व माहिती मिळाली. येथे प्रत्येक विमानाची सविस्तर माहिती दिली जाते. वैमानिकांच्या केबिनपासून ते विमान कसे तयार होते, याची मला आज माहिती मिळाली. - ऋतुराज साथव

Web Title: 'Air Travel' concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.