शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळच्या पावसाने जागवली रात्र, दुपारी उडवली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 16:55 IST

Rain Kolhapur- ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह आलेल्या या पावसाने संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत टप्प्या टप्याने हजेरी लावत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. गुरुवारी दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावत सर्वाचीच तारांबळ उडवली.

ठळक मुद्देऐनवेळच्या पावसाने जागवली रात्र, दुपारी उडवली तारांबळढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह सलग दोन दिवस जिल्हाभर पाऊस

कोल्हापूर: ओडीसाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळसदृश्य हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम होऊन निरभ्र आभाळ आणि कोरडे हवामान असतानाही बुधवारच्या रात्री अचानक पावसाने एन्ट्री केली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह आलेल्या या पावसाने संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत टप्प्या टप्याने हजेरी लावत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. गुरुवारी दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावत सर्वाचीच तारांबळ उडवली.हवामान खात्याने १७ ते १८ रोजी विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो बुधवारी कोल्हापुरात तंतोतंत खरा ठरला. सोमवारपासून जिल्ह्यात दाट धुके पडत आहे. दवही जास्त असल्याने पहाटे झाडावरुन पाण्याचे थेंबही पडत आहेत. सकाळी गारवा आणि दिवसभर कडक उन्हाचे चटकेही बसत आहेत.

बुधवारी सकाळीही असेच धूके होते, त्यानंतर कडक उन पडले. दुपारी दोन नंतर मात्र वातावरण अचानक ढगाळ झाले. गार वारेही जोरात वाहू लागले. संध्याकाळी गडहिग्लज, आजरा परिसरात पावसाने हजेरीही लावली. रात्री दहानंतर पुन्हा विजांचा कडकडाट सुरु झाला आणि पावसाला सुरुवात झाली.

कोल्हापूर शहर परिसरात दीडच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. जवळपास तासभर पाऊस पडत होता. दरम्यान गुरुवारीही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. सकाळी ढगाळ वातावरण दिसत होते. दहानंतर ते निवळले, गारवा कमी होऊन उष्माही वाढला पण दुपारी दोन नंतर पुन्हा आभाळ भरुन आले आणि पावसाने ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत राहील आणि त्यानंतर शुक्रवारी वातावरण पुर्णपणे निवळेल असा हवामान खात्याने सांगितले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर