शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
3
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
4
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
5
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
6
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
7
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
8
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
9
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
10
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
11
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
12
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
13
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
14
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
15
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
16
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
17
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
18
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
19
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
20
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

ऐन दिवाळीत शहरात दोन खुनांचा थरार; फुलेवाडीत तरूणाचा पाठलाग करून धारदार शस्त्राने खून

By उद्धव गोडसे | Updated: November 14, 2023 09:43 IST

मंगळवार पेठेत डोक्यात काठी घातल्याने पानटपरी चालक ठार 

कोल्हापूर : ऐन दिवाळीत शहरात सोमवारी (दि. १३) रात्री दोन घटनांमध्ये दोघांचा निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली. फुलेवाडी परिसरात शेतकरी धाब्याजवळ तीन हलेखोरानी पाठलाग करून कोयता, एडका आणि तलवारीचे १६ वार करून सराईत गुंड ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय २४, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याचा खून केला. तर मंगळवार पेठेत बालगोपाल तालमीजवळ सतीश बाबुराव खोत (वय ५८, र. मंगळवार पेठ) या पान टपरीचालकाच्या  डोक्यात काठीने मारहाण झाल्याने त्यांचा  खून झाला. या दोन्ही घटनांनंतर सोमवारी रात्री सीपीआरच्या अपघात विभागासमोर मोठी गर्दी झाली होती.

याबाबत अधिक माहिती आशी की, संपूर्ण शहर दिवाळीचा सण साजरा करण्यात दंग असताना शहरातील दोन खुनाच्या घटना घडल्या. हाणामारीचे गुन्हे दाखल असलेला पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत ऋषीकेश नलवडे हा फुलेवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये मित्रासोबत जेवण करण्यासाठी निघाला होता. मित्राच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जाताना काही तरुण पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकीवरून उडी मारली. आपल्या पोरांना बोलवून घे, असे मित्राला सांगून तो अंधारातून पळत सुटला. तोंडाला मास्क लावलेल्या तिघांनी ऋषीकेशचा पाठलाग केला. बंद पडलेल्या गुऱ्हाळगृहाजवळ ऋषीकेशला खाली पाडून त्याच्यावर तलवार, चाकू, एडकाने सपासप वार केले. मान, हात, पाठीवर १६ वार झाले. प्रतिकार करताना त्याच्या हाताची बोटेही तुटली. तो मेल्याची खात्री करूनच हल्लेखोर निघून गेले.

काही वेळातच ऋषिकेशचे मित्र घटनास्थळी पोहोचले. रक्ताने माखलेल्या ऋषीकेशला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.  मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऋषिकेशचा खून झाल्याचे समजताच त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. वर्चस्ववाद आणि टोळी युद्धातून खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. अन्य कारणांचाही शोध घेतला जात आहे.

सीपीआरमध्ये पोलिसांचा फौजफाटा  खुनाच्या घटनेची माहिती मिळताच प्रभारी शहर पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्यासह पथक सीपीआर lमध्ये दाखल झाले. मृताचे नातेवाईक आणि मित्रांची गर्दी वाढल्याने पोलीसांनी बंदोबस्त वाढवला.

 मंगळवार पेठेत पाणटपरी चालकाचा खून मंगळवार पेठेत बालगोपाल तालमीजवळ राहणारे पानटपरी चालक सतीश बाबुराव खोत हे घरासमोर रात्री नऊच्या सुमारास झोपले होते. त्यावेळी त्यांचा एका मित्रासोबत वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. यातून मित्राने काठी आणून झोपलेले खोत यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. मारहाणीत डोके फुटून खोत यांचा जागीच मृत्यू झाला. गल्लीतील लोकांनी रिक्षातून खोत यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस