शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘एड्स’ संसर्गीतांना आता ‘एसटी’ मोफत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 10:35 IST

दुर्धर आजाराने (एचआयव्ही/एड्स) त्रस्त व्यक्तींना त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालय येथे प्रवास करण्यासाठी प्रती प्रवास ५० किमी १०० टक्के विनामूल्य करण्यास सवलत दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, एन. के. पी. प्लसतर्फे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य व परिवहन महामंडळ यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.

ठळक मुद्दे‘एड्स’ संसर्गीतांना आता ‘एसटी’ मोफत!कोल्हापूर एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, एन. के. पी. प्लसतर्फे पाठपुरावा

कोल्हापूर : दुर्धर आजाराने (एचआयव्ही/एड्स) त्रस्त व्यक्तींना त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालय येथे प्रवास करण्यासाठी प्रती प्रवास ५० किमी १०० टक्के विनामूल्य करण्यास सवलत दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, एन. के. पी. प्लसतर्फे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य व परिवहन महामंडळ यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.एच. आय. व्ही. संसर्गीत व्यक्तींना निरोगी आरोग्य टिकविण्याकरिता आयुष्यभर ए. आर. टी. उपचारांची गरज भासते. ही औषधे सरकारी रुग्णालयात मोफत मिळतात. या औषधांकरिता रुग्णास नियमित ए. आर. टी. सेंटरला फेऱ्या माराव्या लागतात. आधीच हलाखीची स्थिती असणाऱ्या रुग्णास प्रवासखर्च झेपत नसल्याने हे उपचार थांबले जातात. परिणामी नियमित औषधे न घेतल्याने मृत्यूचा धोका वाढतो.कोल्हापूर एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि एन. के. पी. प्लस यांनी एकत्रितरीत्या मोफत एस. टी. बस प्रवासासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता; पण काही तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गीत लाभार्थी वंचित राहिले होते; त्यामुळे हा विषय जिल्हा एड्स नियंत्रण समितीपुढे मांडण्यात आला.समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतच्या तांत्रिक अडचणी ताबडतोब सोडविण्याविषयी विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांना सूचना केल्या. त्यानुसार पलंगे यांनी स्वत: लक्ष घालून ही कार्यवाही तातडीने केली.

जिल्हाधिकारी देसाई यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सुरुवातीचे मोफत बस पासचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा एड्स नियंत्रण पथकाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, एन. के. पी. प्लसचे प्रकल्प समन्वयक संजय साऊळ, वैशाली बगाडे, सुनीता पाटील, अनिकेत खाडे, गीता माने, रविराज पाटील, संदीप कोले-पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर