नवीन वाशी नाका येथे साकारणार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:36+5:302021-07-08T04:16:36+5:30
कळंबा : नवीन वाशी नका येथे सहा हजार चौरस फुटांत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक साकारण्यात येणार ...

नवीन वाशी नाका येथे साकारणार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक
कळंबा : नवीन वाशी नका येथे सहा हजार चौरस फुटांत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक साकारण्यात येणार असून, याची पायाभरणी व भूमिपूजन समारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी या स्मारकासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पालिका अंदाजपत्रकात या स्मारकाच्या उभारणीसाठी पन्नास लाखांची तरतूद करण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनास केली होती. त्यानुसार उपलब्ध निधीमधून भव्य स्मारकाच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
भविष्यात अंदाजे दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. निधी उपलब्धतेनुसार भव्य पुतळा, आर्ट गॅलरी, जीवन शिल्पे संरक्षक कठडा, ग्रंथालय, आदी उभारण्यात येणार आहे.
माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, युवराज तेली, सागर यवलुजे, माजी महापौर निलोफर आजरेकर, सुलोचना नाईकवडे, सुवर्णा रानगे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पायाभरणी समारंभ पार पडला. या वेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, किरण पाटील, बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते.
फोटो : ०७ वाशी नाका स्मारक
नवीन वाशी नाका येथे उभारण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारक भूमिपूजन समारंभप्रसंगी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, सागर यवलुजे, गोकुळ संचालक बयाजी शेळके, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, सुवर्णा रानगे, माजी महापौर निलोफर आजरेकर, सुलोचना नायकवडी उपस्थित होते.