कृषीतज्ज्ञ जे. बी. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:57+5:302021-06-17T04:17:57+5:30

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) शेती व ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंगराव बाळकृष्ण पाटील (वय ७७) यांचे बुधवारी निधन झाले. ...

Agronomist J. B. Patil passed away | कृषीतज्ज्ञ जे. बी. पाटील यांचे निधन

कृषीतज्ज्ञ जे. बी. पाटील यांचे निधन

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) शेती व ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंगराव बाळकृष्ण पाटील (वय ७७) यांचे बुधवारी निधन झाले. जे. बी. अप्पा या नावाने ते परिचित होते. त्यांनी एम.एस्सी कृषी पदवी पुणे विद्यापीठातून व एम. एस. पदवी अमेरिकेतून घेतली होती. राहुरी कृषी विद्यापीठात पाच वर्षे कार्यकारी सदस्य म्हणूनही काम केले. कृषी पुरस्कारानेही ते सन्मानित होते. नद्याजोड प्रकल्पविषयी त्यांचा आग्रह होता. वाळवा तालुक्याचे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रेरणेतून आणि सहकार्यातूनच ते अमेरिकेत एम. एस. करण्यासाठी गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (१६०६२०२१-कोल-जे.बी.पाटील निधन )

रामचंद्र जितकर

कोल्हापूर : अंबाई डिफेन्स येथील रामचंद्र कृष्णाजी जितकर (वय ६२) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. (१६०६२०२१-कोल-रामचंद्र जितकर निधन )

Web Title: Agronomist J. B. Patil passed away