कोळवण येथे कृषी दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:15+5:302021-07-03T04:16:15+5:30
गारगोटी, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग करावा. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास पिकांचे उत्पादन वाढून खर्चात ...

कोळवण येथे कृषी दिन उत्साहात साजरा
गारगोटी,
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग करावा. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास पिकांचे उत्पादन वाढून खर्चात कपात झाल्याने आर्थिक भरभराट होईल, असे प्रतिपादन भुदरगड पंचायत समितीच्या सभापती आक्काताई प्रवीण नलवडे यांनी केले.
त्या कोळवण (ता. भुदरगड) येथे कृषी संजीवनी सप्ताहामध्ये अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. गटविकास अधिकारी एस.जे. पवार प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांचे हस्ते प्रगतशील शेतकरी कृष्णात जरग यांचा सत्कार व लोटेवाडीचे शेतकरी मारुती सारंग यांना पॉवर विडर प्रदान केला.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी एस. एस. भोकरे, कृषी अधिकारी नितीन भांडवले, विस्ताराधिकारी अभिजित पाटील, ओमकार करळे, कृष्णात जरग यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास सरपंच पूजा गुरव, उपसरपंच सविता पाटील, प्रवीण नलवडे, एम. डी. पाटील, चंद्रकांत शिंदे, बी. बी. काळे, व्ही. एस. सावेकर, अभिजित पाटील, सुनील डवरी, महेश भोपळे, मारुती गुरव, ग्रामसेवक राहुल पाटील यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार अभिजित पाटील यांनी मानले.