शेती औजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान

By Admin | Updated: November 28, 2014 23:45 IST2014-11-28T23:06:31+5:302014-11-28T23:45:37+5:30

कृषी विभागाची योजना : राज्यातील ३७ हजार शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

Agricultural Mechanization Sub-Mission for Agricultural Tools | शेती औजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान

शेती औजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान

प्रकाश पाटील - कोपार्डे शेती विकासासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबवले जाणार आहे.
या अभियानातून राज्यातून तब्बल १६ हजार ९७० औजारांचे वाटप केले जाणार आहे. योजनेतून अनुदान देण्यासाठी २५ कोटी ६८ लाख ४७ रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना शेती कामासाठी कमी दरात औजारे उपलब्ध होण्यासाठी शेतकरी गटाच्या माध्यातून ६७ औजारे बॅँका केल्या जाणार आहेत. त्यासाठी चार कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर शेतीसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून यावर्षी केंद्र व राज्यसरकार संयुक्तपणे शेती विकासासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान राबवले जाणार आहे. यासाठी घटक तीन मधून ट्रॅक्टरचा लाभ दिला जाणार आहे. अनुसूचित जाती जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वालाख तर शेतकऱ्यांना एक लाख पॉवर टिलरसाठी राखीव प्रवर्गातील शेतकऱ्यांना सव्वालाख व इतरांसाठी साठ हजार, स्वयंचलित औजारात भातलावणी यंत्रासाठी दोन लाख ट्रॅक्टर चलित औजारासाठी राखी प्रवर्गातील शेतकऱ्यांना ६३ हजार व इतरांसाठी पन्नास हजार मनुष्यचलित औजाराला राखीव प्रवर्गासाठी दहा हजार व इतरांसाठी आठ हजार, पीक संरक्षक मनुष्यचलित औजाराला राखीव प्रवर्गासाठी सहाशे रुपये व इतरांसाठी पाचशे रुपये, पीक संरक्षण पॉवर आॅपरेटेड उपकरणासाठी राखीव प्रवर्गासाठी तीन हजार आठशे तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना तीन हजाररुपये अनुदान दिले जाणार आहे.
राज्यात अशी १६ हजार ९७० औजारांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी २५ कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध होणार आहे. प्रचलित दरापेक्षा कमीदराने शेती कामासाठी औजारे उपलब्ध होण्यासाठी शेतकरी गटाच्या माध्यमातून औजारे बॅँक स्थापन केली जाणार आहे.
राज्यात अशा ६७ बॅँका होणार आहेत. याच्या लाभासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. त्यानंतर तालुक्याहून प्राप्त झालेल्या प्रस्तावातून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थ्यांची निवड करणार आहे. यातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७८६ औजारांची उपलब्धता होणार आहे. सर्वात जास्त नगरसाठी एक हजार ६८ औजारे मिळणार आहेत.

Web Title: Agricultural Mechanization Sub-Mission for Agricultural Tools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.