शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

रुकडी येथे होणार कृषी विकास-संशोधन केंद्र रयत शिक्षण संस्थेचा प्रकल्प : जिल्ह्यातील शेतकºयांना येथे कृषी पर्यटन, मार्गदर्शन केंद्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:42 PM

रुकडी माणगाव : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विकास व संशोधन केंद्र या अँग्री हबची उभारणी करण्यात

अभय व्हनवाडे ।रुकडी माणगाव : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विकास व संशोधन केंद्र या अँग्री हबची उभारणी करण्यात येत आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून, शेतकºयांना येथे कृषी पर्यटन व मार्गदर्शन केंद्राची सुविधा उपलब्ध होणार आहे.

रयत शिक्षण संस्थेस छ. राजाराम महाराज यांनी १३६ एकर माळ जमीन देणगी दाखल दिली होती. येथे मुलांचे वसतिगृह, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कृषी शिक्षणाची सुविधा संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता एकूण जमिनीपैकी ३५ एकर जमिनीवर शिक्षणसंस्था विस्तारली आहे. उर्वरित जमीन विनावापर पडून राहिली आहे. या जमिनीचा वापर व्हावा याकरिता येथील माजी मुख्याध्यापक व शिक्षक प्रयत्न करीत होते. याशिवाय या संस्थेचे कार्यकारी संचालक मंडळ, सदस्य डॉ. एन. डी. पाटील येथे काहीतरी प्रकल्प उभारण्यासाठी आग्रही होते. यातून येथे अँग्री हब उभारण्याची संकल्पना पुढे आली.

संस्थेच्या १0१ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा विचार पुढे आला. हा विचार संस्थेचे माजी अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या समोर मांडण्यात आला. त्यांच्या पुढाकाराने जैन इरिगेशन यांच्या सल्ल्याने येथील क्षेत्रात ऊस, आंबा, पेरू, केळी, आदी पिकांची लागवड करण्यात येणार आहे. याकरिता येथील पंचगंगा नदीपासून जवळपास पावणेतीन किलोमीटर अंतरावर पाणी आणण्यात आले आहे. यासाठी दहा इंच व्यासाची जलवाहिनी व पंचवीस एच.पी.च्या दोन मोटरींचा वापर केला आहे.

सर्व क्षेत्र ओलिताखाली येण्याकरिता ठिबक सिंचन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पिकांना खते व पाणी उपलब्धतेचे तंत्रज्ञान हाताळणी संगणकाद्वारे जैन इरिगेशन जळगाव येथून कार्यालयात बसून करणार आहे. मजुरांचा तुटवडा भासल्यास फक्त चार कर्मचाºयांवर कामकाज चालावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यासाठी ५६ बाय ५६ या अंतराचे मध्य ठिकाणी शेततळे उभारण्यात आले आहे. या शेततळ्यात ६७ लाख लिटर व पाच दिवस पुरेल इतकी पाणी साठवणूक क्षमता आहे.उत्पादित होणाºया वस्तंूची प्रात्यक्षिके१0१ एकर क्षेत्रात ४१ एकर ऊस, २0 एकर हंगामी पीक, १५ एकर केशर आंबा, १५ एकर लखनौ पेरू, १0 एकर जी-९ केळीची लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय तीन एकर क्षेत्रात पथ प्रकल्प व जैन इरिगेशनच्या उत्पादित होणाºया वस्तंूची प्रात्यक्षिके ठेवण्यात येणार आहेत.

शेतकरी पर्यटनस्थळ, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, कृषी महाविद्यालय साकारण्यात येणार असून, याकरिता १४ एकर जमिनाचा वापर करण्यात येणार आहे.या प्रकल्प केंद्राची उभारणी करण्यास माजी अध्यक्ष शरद पवार व डॉ. एन. डी. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत; पण त्याशिवाय जैन इरिगेशन यांनी येथे उभारण्यात येणाºया तंत्रज्ञानाच्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम स्वीकरणार आहे.