घाटाकडच्या रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST2021-06-25T04:17:33+5:302021-06-25T04:17:33+5:30

कोल्हापूर शुक्रवार पेठ पोलीस चौकी ते पंचगंगा नदीघाट या रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा आंदोलन करण्याचा ...

Agitations if the road to Ghat is not paved | घाटाकडच्या रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास आंदोलन

घाटाकडच्या रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास आंदोलन

कोल्हापूर शुक्रवार पेठ पोलीस चौकी ते पंचगंगा नदीघाट या रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्री उत्तरेश्वर शुक्रवार पेठ, युवा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी बुधवारी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना याबाबत निवेदन दिले आहे.

सातत्याने दोन वर्षे मागणी करूनही या रस्त्यांचे काम झालेले नाही. पावसाळा सुरू झाला की चिखल आणि उन्हाळ्यात प्रचंड धूळ आणि वाहतुकीला अडथळा अशा तिहेरी समस्यांचा नागरिकांना नाहक त्रास होतो. वेगवेगळ्या वेळी अन्य कामे सुरू असल्याचे सांगण्यात येते. आता ही सर्व कामे झाली आहेत. तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी माेहसीन मणेर, विराज चिखलीकर, सम्राट शिर्के, स्वप्निल साठे, इंद्रजित नलवडे, अनिल बागवान उपस्थित होते.

Web Title: Agitations if the road to Ghat is not paved