पेन्शनसाठी आज करवीर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:25 IST2021-03-17T04:25:27+5:302021-03-17T04:25:27+5:30
काेल्हापूर : संजय गांधी व श्रावणबाळ पेन्शन योजनेचे पैसे गेली सहा महिने लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत, याविरोधात आज, बुधवारी करवीर ...

पेन्शनसाठी आज करवीर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन
काेल्हापूर : संजय गांधी व श्रावणबाळ पेन्शन योजनेचे पैसे गेली सहा महिने लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत, याविरोधात आज, बुधवारी करवीर तहसीलदार कार्यालयाच्या समोर बूट पॉलिश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाचे शहराध्यक्ष भारत कोकाटे यांनी दिली.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन याेजनेचे पैसे गेली सहा महिने शासनाने दिलेले नाहीत. याबाबत जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये विचारपूस केल्यानंतर व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. गोरगरिबांच्या जगण्याचा आधार असलेली पेन्शन बंद झाल्याने ते हवालदिल झाले आहेत. याविरोधात अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने आज दुपारी साडेबारा वाजता करवीर तहसीलदार कार्यालयाच्या दारात बूट पॉलिश आंदोलन करणार असल्याचे भारत कोकाटे यांनी सांगितले.