कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या ८३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६८५ झाली आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्त सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ४७ वर्षीय व्यक्तीचा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.आजरा तालुक्यात दोन, भुदरगडमध्ये एक, गडहिंग्लजमध्ये सहा, हातकणंगले दहा, कागल तीन, करवीर तीन, शाहूवाडी चार, शिरोळ एक, नगरपालिका १३, तर कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात २५ नवे रुग्ण सापडले आहेत. इतर जिल्ह्यातून आलेल्या १५ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दिवसभरामध्ये ४३९ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर १३२२ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. १५८ अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे.आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील ६७ वर्षांच्या पुरुषाचा, याच तालुक्यातील सोहाळे येथील ८० वर्षांच्या वृद्धाचा, शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील ५६ वर्षांच्या महिलेचा आणि हातकणंगले तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दिवसभरामध्ये ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Coronavirus kolhapur updates -पुन्हा नवे ८३ कोरोना रुग्ण, एका महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 11:27 IST
CoronaVirus kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या ८३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६८५ झाली आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्त सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ४७ वर्षीय व्यक्तीचा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
Coronavirus kolhapur updates -पुन्हा नवे ८३ कोरोना रुग्ण, एका महिलेचा मृत्यू
ठळक मुद्देपुन्हा नवे ८३ कोरोना रुग्ण, एका महिलेचा मृत्यूएकूण रुग्णांची संख्या ६८५