शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

दीड वर्षानंतर विमानाचे मुंबईहून कोल्हापूरकडे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:58 IST

गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत ट्रू जेटच्या ७२ आसनी विमानातून मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले. यामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता.

ठळक मुद्देकोल्हापूर-मुंबई विमानसेवेला सुरुवात : पहिल्या विमानातून ६३ प्रवासी आले महापुरामुळे भारतीय विमान प्राधिकरणाने मोठा समारंभ टाळला

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत ट्रू जेटच्या ७२ आसनी विमानातून मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले. यामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता.

महापुराच्या छायेमुळे भारतीय विमान प्राधिकरणाने मोठा समारंभ टाळून ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हस्ते दीपप्रज्वलन केले व केक कापण्यात आला. रखडलेली विमानसेवा सुुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटल्या.गेल्यावर्षी एप्रिलमध्ये एअर डेक्कन कंपनीने विमानसेवा सुरू केली होती; परंतु कंपनीअंतर्गत अडचणींमुळे ती बंद पडली. त्यानंतर आजतागायत विमानसेवा सुरू झाली नव्हती. तिला रविवारी मुहूर्त मिळाला. दुपारी दीडच्या सुमारास ट्रू जेट कंपनीचे विमान येणार असल्याने मुंबईकडे जाणारे प्रवासी व मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी आलेले नातेवाईक, मित्रमंडळी व प्राधिकरणाचे कर्मचारी यांमुळे हा परिसर फुलून गेला होता.

दुपारी २ वाजून २० मिनिटांंनी मुंबईहून ७२ आसनी विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. या ठिकाणी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे अग्निशमन दलाच्या बंबातून वॉटर शॉवर करीत या विमानाचे स्वागत करण्यात आले. विमानातून उतरलेल्या प्रवाशांचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

जिल्ह्यावर महापुराचे सावट असल्याने कोणताही झगमगाट किंवा मोठा सोहळा प्राधिकरणाच्या वतीने टाळण्यात आला. विमानतळावर छोटेखानी कार्यक्रमात ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केक कापण्यात आला. काही वेळातच हे विमान ४३ प्रवाशांना घेऊन पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल आपल्याला मनस्वी आनंद आहे. ही सेवा अशीच सुरूराहावी. मुंबईहून कोल्हापूरपर्यंतचा विमानप्रवास हा सुखकर व आनंददायी राहिला.- डॉ. डी. वाय. पाटील,माजी राज्यपाल

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरूझाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. या विमानसेवेत आता कोणताही खंड न पडता त्यात सातत्य राहिले पाहिजे. तसेच वेळेचाही थोडा विचार झाला पाहिजे.-के. के. खराडे, प्रवासी, मुंबई

 

गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली विमानसेवा पुन्हा सुरूझाल्याने आनंद होत आहे; यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवर मोठे प्रयत्न झाले आहेत. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत. विमानसेवेसाठी, प्रवाशांच्या बुकिंगसाठी चांगला प्रतिसाद आहे.- कमल कटारिया,संचालक, कोल्हापूर विमानतळ

पाच दिवस विमानाचे उड्डाणअखेर केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेतून ट्रू जेट कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात यश आले आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे पाच दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरात उतरणार असून, १५ मिनिटे थांबून १ वाजून ५० मिनिटांनी ते मुंबईला रवाना होणार आहे.‘इंडिगो-ट्रू जेट’ची भेटमुंबईहून दुपारी कोल्हापूर विमानतळावर उतरलेले ट्रू जेट कंपनीचे विमान उतरले. त्याचवेळी तिरूपतीहून विमानतळावर येऊन थांबलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाने हैदराबादकडे उड्डाण केली. दोन्ही विमाने एकत्र आल्याचे दृश्य मोबाईलमधून टिपण्यासाठी उपस्थितांची झुंबड उडाली. 

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर