शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

Kolhapur: विशाळगडावरील पर्यटन बंदीमुळे गावकरी मिठालाही महाग, मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:25 IST

कोल्हापूर : विशाळ गडावर झालेल्या दंगलीनंतर येथील पर्यटनावर सरकारने थेट निर्बंध लादल्याने ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधनच बंद झाले आहे. पर्यटनावर ...

कोल्हापूर : विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर येथील पर्यटनावर सरकारने थेट निर्बंध लादल्याने ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधनच बंद झाले आहे. पर्यटनावर सुरू असलेली विशाळगडावरची अर्थव्यवस्था थांबली असून, गावकरी मिठालाही महाग झाले आहेत, त्यामुळे विशाळगडावरची स्थिती पूर्ववत करा, असे आर्जवच येथील ग्रामस्थांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे. एका सजग नागरिकाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विशाळगडप्रकरणी आता सरकारने भूमिका घेण्याची मागणी होऊ लागली आहे.पत्रात म्हंटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून आमच्या गावचे पर्यटन पूर्णपणे बंद आहे. दि. १४ जुलै रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर गावात सामान्य रहिवाशांचे जीवन दयनीय झाले आहे. आमचे इतिहासकालीन गाव, आमच्या अनेक पिढ्या येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. आमचे गाव हिंदू-मुस्लीम एकोप्याचे प्रतीक आहे. आम्ही शिवजयंती, ऊरुस, गणेशचतुर्थी, मोहरम, रामनवमी एकत्र साजरे करतो. आम्ही मिळून अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. विशाळगड हे गाव प्रमुख महसूल ठिकाण असून, येथे बाहेरील राज्यातूनही पर्यटक येतात. मात्र, पर्यटकांना बंदी घातल्याने गावकरी मिठालाही महागले आहेत. गॅस सिलिंडर, अन्नधान्य, विजेचे बिल यांसारख्या मूलभूत गरजा भागविणेही कठीण झाले आहे. कित्येक घरे अंधाराखाली गेली आहेत. अनेक पोटांना उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. शाळा, कॉलेजचे शुल्क भरता न आल्याने मुलांना शाळेत पाठवणे अवघड झाले आहे. बंद अर्थव्यवस्था येथील आठ वाडींसाठी हानीकारक आहे. आमच्या मुलांचे भविष्य टांगणीला आहे. आमचा गुन्हा काय?, आमच्यावर अत्याचार का ?. आम्ही कचरा व्यवस्था व अतिक्रमणाबाबत सहकार्य करण्यास तयार आहे, पण विशाळगडाची स्थिती पूर्ववत करा, अशी कळकळीची विनंती या पत्राद्वारे ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटनChief Ministerमुख्यमंत्रीFortगड