छेडछाडीनंतर कोल्हापूरच्या युवकावर तेल ओतले

By Admin | Updated: July 21, 2014 00:40 IST2014-07-21T00:34:47+5:302014-07-21T00:40:07+5:30

आंबोलीतील घटना : महिलांचे दागिनेही लंपास

After pestering, he poured oil on the youth of Kolhapur | छेडछाडीनंतर कोल्हापूरच्या युवकावर तेल ओतले

छेडछाडीनंतर कोल्हापूरच्या युवकावर तेल ओतले

आंबोली : वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आलेल्या कोल्हापूर येथील महिलांची, युवतीची छेडछाड काढल्यावरून स्थानिक व कोल्हापूर येथील युवकांत बाचाबाची झाली.
स्थानिक युवकांनी कोल्हापूरच्या युवकांवर हॉटेलमधील कढईतील तेल ओतले. त्यात बाबू मिसाळ हा युवक गंभीर जखमी झाला. यावेळी महिलांचे दागिनेही लंपास केल्याचा प्रकार घडला. स्थानिक युवकांनी पोबारा केला असून, उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. ही घटना सायंकाळी हिरण्यकेशीनजीक तावडे हॉटेल येथे घडली. सायंकाळच्या सुमारास कोल्हापूर येथील पर्यटक ट्रॅव्हलमधून हिरण्यकेशीकडे जात असतानाच तेथे सिंधुदुर्गातील एक सुमो गाडी (एमएच 0७ जे २७0) आली. या गाडीत युवक होते. त्यांनी ट्रॅव्हलर्समधील महिला व युवतीची छेड काढली. यामुळे कोल्हापूर येथील ट्रॅव्हलर्समधील युवकांनी सुमो गाडीतील युवकांना जाब विचारला; पण त्या टॅ्रव्हलर्समधील युवकांना स्थानिक युवकांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण सुरू असतानाच कोल्हापूरचे बाबू मिसाळ हे तावडे हॉटेलमध्ये पळाले. यावेळी स्थानिक युवकांनी त्यांचा पाठलाग करीत हॉटेलमधील कढईतील तेल त्या युवकाच्या अंगावर ओतले. यात बाबू मिसाळ गंभीर जखमी झाला. मिसाळ यांच्यावर आंबोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे हलविले आहे. मिसाळ यांच्या माहितीनुसार युवक मद्यपी होते. त्यांच्यासोबत आणखी एक गाडीही होती. (प्रतिनिधी)

Web Title: After pestering, he poured oil on the youth of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.