शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पद्मावतनंतर मसाई पठारावर लवकरच आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:47 IST

निर्मात्यांसाठी हे पठार कमी खर्चात मोठे नाव मिळवून देते

नितीन भगवानपन्हाळा : पन्हाळगडाजवळील मसाई पठारावर येत्या एप्रिल अखेरपासून सलग एक महिना एक मोठ्या चित्रपट निर्मात्याच्या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या निरनिराळ्या परवानग्या घेतल्या जात आहेत. येथे उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक वाडे, घरे, मंदिरांच्या रचनेसाठी डिझायनरनी स्थळ पाहणी करून आराखडे तयार करण्याचे काम सुरू केले आहे.चित्रपटात काम करण्यासाठी आघाडीचे दोन मोठे कलाकार येणार असून, त्यांचा मुक्काम पन्हाळगडावर असणार आहे. या सर्व चित्रपट निर्मितीची गुप्तता पाळली जात असून, चित्रीकरण करताना मसाई पठारावर त्या काळात प्रवेशबंदी घातली जाण्याची शक्यता आहे. संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी येथे जाळपोळ झाली होती. तसा काही प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे.पर्यटकांना आकर्षित करणारे मसाई पठारावर मराठी - हिंदी चित्रपट , वेगवेगळ्या मालिका, वेबसिरीज, लघुपट, विविध जाहिरातींसाठी निर्मात्यांची पावले या ठिकाणी नेहमीच वळतात. चित्रीकरणासाठी आवश्यक असणारी बाजू तसेच पठाराच्या सुरुवातीलाच व सभोवताली असणारे जंगल, विस्तीर्ण पठार, लेणी परिसर, छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेली चहाची बाग, यामुळे जिल्ह्यातील चित्रीकरण स्थळ म्हणून मसाई पठार चर्चेत आहे. निर्मात्यांसाठी हे पठार कमी खर्चात मोठे नाव मिळवून देते.

कोल्हापुरात चित्रीकरणासाठी येणाऱ्या निर्मात्यांना माझ्या संस्थेमार्फत सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वच प्रकारच्या चित्रीकरणासाठी मसाई पठार हे ठिकाण अगदी उत्तम ठिकाण आहे. शासनाने पायभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास स्थनिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. - मिलिंद आष्टेकर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, माजी उपाध्यक्ष चित्रपट महामंडळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShootingगोळीबार