शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

LokSabha2024: शाहू छत्रपती यांच्या भेटी, लग्नसमारंभात व्यस्त शेट्टी

By पोपट केशव पवार | Updated: May 23, 2024 12:23 IST

संजय मंडलिक स्पेनमध्ये : उमेदवारांना कोल्हापूरच वाटते 'भारी'

पोपट पवार कोल्हापूर : लोकसभेचे मतदान झाल्यानंतर प्रमुख उमेदवार असलेले शाहू छत्रपती, राजू शेट्टी, सत्यजित पाटील-सरुडकर हे लोकांच्या गाठीभेटीत व्यस्त असून, प्रा. संजय मंडलिक हे स्पेन व इटलीच्या दौऱ्यावर आहेत. धैर्यशील माने हे मुंबईत प्रचारासाठी गेले होते.लोकसभेची रणधुमाळी नुकतीच पार पडली असून, उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्तेही आता रिलॅक्स मुडमध्ये आहेत. त्यामुळे राज्यभरातील बहुतांश उमेदवार व त्यांचे जवळचे कार्यकर्ते निवडणुकीतील थकवा दूर करण्यासाठी परदेशवारीसाठी गेले आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील बहुतांश उमेदवारांना आपला जिल्हा, शहरच अधिक प्रिय असल्याचे दिसते.कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान पार पडले. त्याआधी उमेदवारांना जवळपास महिनाभर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांना पायाला भिंगरी लावून मतदारसंघ धुंडाळावा लागला. रोजच्या पाच ते सहा सभा, दहा-पंधरा गावांना भेट, नागरिकांशी संवाद, कार्यकर्त्यांबरोबर बैठका ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी ज्येष्ठत्वाच्या वयातही मतदारसंघ धुंडाळून काढला. निवडणूक संपल्यानंतर मात्र त्यांनी कोल्हापुरातच थांबणे पसंत केले आहे. ते न्यू पॅलेसवर आलेल्या नागरिकांना भेटत असतात. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक हे जिल्हा बँकेच्या संचालकांसोबत स्पेन व इटली दौऱ्यावर फिरण्यासाठी गेले आहेत.

चुकलेली लग्नं अन् शेट्टी यांच्या भेटीसतत जनतेमध्ये राहणारे नेतृत्व म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी ओळखले जातात. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यंदा ते तिसऱ्या वेळी लढले. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा जनतेच्या प्रश्नांसाठी एकरूप झाले. निवडणुकीच्या काळात अनेक लग्न समारंभांना, अंत्यसंस्कारांना त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. मात्र, सध्या ते त्या काळात ज्यांच्या घरी शुभमंगल झाले अशा घरी भेटी देत नवदाम्पत्यांना शुभेच्छा देत आहेत. निवडणुकीच्या काळात ज्यांच्या घरी निधनासारखे दुर्देवी प्रसंग ओढावले, त्यांच्या घरी शेट्टी सांत्वनपर भेटी देत आहेत.

माने, सरुडकरही मतदारसंघातचहातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे सध्या मतदारसंघातच आहेत. पक्षाच्या प्रचारासाठी ते तीन दिवस मुंबईत होते. याच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर हेही मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवित आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीdhairyasheel maneधैर्यशील मानेsanjay mandlikसंजय मंडलिकRaju Shettyराजू शेट्टीSatyajit Patilसत्यजित पाटील