तेरणीत वडिलांनंतर, मुलगा-सुनेला ग्रामपंचायतीवर संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:35+5:302021-01-23T04:24:35+5:30
राष्ट्रवादी पक्षाच्या गुलाब मुल्ला या माजी सदस्यांचा मुलगा मोसीम मुल्ला व स्नुषा करिष्मा मुल्ला हे दोघे वेगवेगळ्या प्रभागांतून निवडून ...

तेरणीत वडिलांनंतर, मुलगा-सुनेला ग्रामपंचायतीवर संधी
राष्ट्रवादी पक्षाच्या गुलाब मुल्ला या माजी सदस्यांचा मुलगा मोसीम मुल्ला व स्नुषा करिष्मा मुल्ला हे दोघे वेगवेगळ्या प्रभागांतून निवडून आले आहेत. दीर-भावजय निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुलाब मुल्ला यांच्या कामाची पोचपावतीच जनतेने त्यांच्या घरातील दोन उमेदवारांना निवडून दिली आहे.
गुलाब मुल्ला या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला २००५ ते २०१० या काळात २ वर्षे उपसरपंच म्हणून संधी दिली होती. अरुणराव देसाई हे गावचे सरपंच होते.
मुल्ला हे संयमी, शांत व गावातील एक जुने पक्षनिष्ठ कार्यकर्ते आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या चौरंगी लढतीत त्यांची स्नूषा करिष्मा मुल्ला प्रभाग ४ मधून, तर लहान मुलगा मोसीम मुल्ला प्रभाग ५ मधून निवडून आले.
गुलाब मुल्लांनंतर त्यांच्या घरातील दोन उमेदवारांना ग्रामपंचायतीवर पाठवून मतदारांनी मुल्ला कुटुंबियांवरचा विश्वास आणखी दृढ केला आहे.
-------------------------
* मोसीम मुल्ला : २२०१२०२१-गड-०२
* करिष्मा मुल्ला : २२०१२०२१-गड-०३
टीप : संबंधित बातमीची उद्याच्या अंकात रुपये ६००० पर्यंत जाहिरात मिळाली आहे. बातमी फोटोसह वापरावी.