शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

इमारत अधिग्रहण वाद: शेतकरी संघाचा विजय!; दसऱ्यानंतर तातडीने जागा परत करा, उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

By राजाराम लोंढे | Updated: October 7, 2023 16:53 IST

अशा प्रकारे जागा अधिग्रहण करता येत नसल्याचे निष्कर्ष नोंदवला

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची भवानी मंडपातील अधिग्रहण केलेले दोन मजले दसऱ्यानंतर म्हणजे २४ ते २७ ऑक्टोबर या दरम्यान तातडीने परत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहीती संघाचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी दिली. अशा प्रकारे कोणाचीही जागा अधिग्रहण करता येत नसल्याचा निष्कर्षही न्यायालयाने नोंदवल्याचे त्यांनी म्हटले आहे.नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकरी संघाची भवानी मंडपातील इमारतीचे दोन मजले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत ताब्यात घेतले आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन मंडप व इतर सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत. मात्र, त्या कलमाखाली जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली, त्याविरोधात संघाच्या सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरच मोर्चा काढला होता.त्याचबरोबर संघ व्यवस्थापनाने उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. त्यावर शनिवारी सुनावणी होऊन दसऱ्यानंतर म्हणजेच २७ ऑक्टोबरपर्यंत संघाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशा प्रकारे कोणाचीही जागा अधिग्रहण करता येत नसल्याचेही न्यायालयाने सांगितल्याचे अध्यक्ष देसाई यांनी म्हटले आहे.

साखर, पेढे वाटून आनंदोत्सवज्या पध्दतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जागा ताब्यात घेतली, त्या प्रक्रियेला सभासद व कर्मचाऱ्यांचा आक्षेप होता. न्यायालयाने संघाची जागा परत करण्याचे आदेश दिल्यानंतर संघाचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी भवानी मंडपात साखर व पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर