विश्वासदर्शकनंतर भाजपचा जल्लोष
By Admin | Updated: November 12, 2014 23:59 IST2014-11-12T23:55:55+5:302014-11-12T23:59:54+5:30
साखर-पेढे वाटून व आतषबाजी करून जल्लोष केला.

विश्वासदर्शकनंतर भाजपचा जल्लोष
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर महानगर भाजपने आज, बुधवारी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा केला. साखर-पेढे वाटून व आतषबाजी करून जल्लोष केला.
दुपारी चारच्या सुमारास पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात आले. त्यानंतर महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.यावेळी महेश जाधव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चितपणे विकासाचे पर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवतील. नगरसेवक सुभाष रामुगडे, आर. डी. पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी जिल्हा सरचिटणीस संतोष भिवटे, हेमंत आराध्ये, संदीप देसाई, किरण कुलकर्णी, मधुमती पावनगडकर, भारती जोशी, सुनीता सूर्यवंशी, अॅड. संपतराव पवार, सुनील टिपुगडे, पपेश भोसले, अतुल कांबळे, सयाजी आळवेकर, सुरेश जरग, दिलीप मैत्राणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभेत भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर भाजपतर्फे बुधवारी शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी साखर-पेढे वाटताना महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अॅड. संपतराव पवार, सुरेश जरग, आदी.