शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युतीतील गर्दी ओसरेल :सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 12:50 IST

‘गेल्या दोन दिवसांपासून लोक मोठ्या प्रमाणात भेटायला येत असून, अनेकांशी चर्चा झाली आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ देत; मग तेथील गर्दी कशी ओसरते ते बघा,’ असा टोला कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लगावला. अनेकजण कॉँग्रेसच्या संपर्कात असून थोड्या दिवसांत नवीन अध्याय सुरू होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

ठळक मुद्देउमेदवारी जाहीर झाल्यानंतर युतीतील गर्दी ओसरेल :सतेज पाटील अनेकजण कॉँग्रेसच्या संपर्कात : थोड्या दिवसांत नवीन अध्याय

कोल्हापूर : ‘गेल्या दोन दिवसांपासून लोक मोठ्या प्रमाणात भेटायला येत असून, अनेकांशी चर्चा झाली आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ देत; मग तेथील गर्दी कशी ओसरते ते बघा,’ असा टोला कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लगावला. अनेकजण कॉँग्रेसच्या संपर्कात असून थोड्या दिवसांत नवीन अध्याय सुरू होईल, असा विश्वासही व्यक्त केला.आमदार पाटील म्हणाले, ‘एनएसयूआय’पासून मी कॉँग्रेसमध्ये काम करीत आहे. अडचणीच्या काळात जबाबदारी दिली आहे. विधानसभा तोंडावरच असल्याने फारशी डागडुजी करता आलेली नाही; पण विधानसभेनंतर सभासद नोंदणीच्या माध्यमातून काम करणार आहे.

सोशल मीडियात आम्ही कमी पडतो, हे खरे आहे; म्हणूनच जिल्हा कॉँग्रेसचा स्वतंत्र मोबाईल क्रमांक सुरू केला असून, त्या माध्यमातून कॉँग्रेसचे नवीन कार्यक्रम आणि सरकारची चुकीची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. वीज दरवाढीने उद्योजक हैराण असून शासनाने त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

मुख्यमंत्र्यांशी चर्चेला बोलावतात आणि निवेदन घेऊनच माघारी पाठविले जाते. चर्चा व्हायला पाहिजे आणि अडचणी सोडविण्याची जबाबदारी शासनाची आहे, असे ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते.महाडिक यांच्या आव्हानाचा विषय संपलापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेची जोरदार तयारी केली असून त्यात धनंजय महाडिक यांच्या प्रवेशामुळे ताकद वाढली आहे. हे आव्हान कसे पेलणार? असे विचारले असता, अगोदरपासूनच महाडिक भाजपसोबत आहेत आणि आव्हानाचे विचाराल तर महाडिकांच्या आव्हानाचा विषय कधीच संपल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.‘स्वाभिमानी’शी चर्चा बाकीदोन्ही कॉँग्रेसमधील जागावाटप पूर्ण झाले असून आता फक्त राजू शेट्टी यांच्याशी चर्चा बाकी आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आघाडी भक्कम होईल, असे पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेस