प्रशासकांच्या कानउघाडणीनंतर यंत्रणा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 11:51 AM2021-01-13T11:51:59+5:302021-01-13T11:57:58+5:30

दीड महिन्यापूर्वी आदेश देऊनही महापालिकेच्या ओपन स्पेसवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यास चालढकलपणा का सुरू आहे? कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, अशा शब्दांत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी संबंधितांची कानउघाडणी केली. यानंतर युद्धपातळीवर संबंधित विभागाची कारवाईसाठी यंत्रणा कामाला लागली. तीन तासांत चार ओपन स्पेसवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

After the administrator's speech, the system started working | प्रशासकांच्या कानउघाडणीनंतर यंत्रणा लागली कामाला

प्रशासकांच्या कानउघाडणीनंतर यंत्रणा लागली कामाला

Next
ठळक मुद्देप्रशासकांच्या कानउघाडणीनंतर यंत्रणा लागली कामाला तीन तासांत चार ओपन स्पेसवरील अतिक्रमणे हटविली

कोल्हापूर : दीड महिन्यापूर्वी आदेश देऊनही महापालिकेच्या ओपन स्पेसवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यास चालढकलपणा का सुरू आहे? कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, अशा शब्दांत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी संबंधितांची कानउघाडणी केली. यानंतर युद्धपातळीवर संबंधित विभागाची कारवाईसाठी यंत्रणा कामाला लागली. तीन तासांत चार ओपन स्पेसवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

लाईन बझार येथील दोन ओपन स्पेसमधील अनधिकृत सात शेड, निवारा कॉलनी येथील एक वीट बांधकामाचे शेड व रमणमळा येथील एक पत्र्याचे शेड काढण्यात आले. ही कारवाई महापालिकेच्या नगररचना, अतिक्रमण, इस्टेट विभाग व विभागीय कार्यालय क्रमांक ४ च्या वतीने करण्यात आली. लाईन बझार येथील कारवाईवेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी करून ओपन स्पेसवरील सर्व अतिक्रमणे काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

एक जेसीबी व दोन डंपरच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमणचे पंडित पोवार, व्ही. एन. सुरवसे, सर्व्हेअर श्याम शेटे, अनिल पाटील यांनी केली.

आता तुमच्यावर कोणाचा दबाव ?

महापालिकेमध्ये मंगळवारी विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. या बैठकीची सुरुवातच शहरातील ओपनस्पेसवरील अतिक्रमणावरून झाली. दीड महिन्यापूर्वी कारवाई करण्याचे सांगूनही दुर्लक्ष का केले? महापालिकेची सभागृहाची मुदत संपली असून आता तुमच्यावर कारवाईसाठी कोणाचा दबाव आहे, अशा शब्दांत प्रशासक डॉ. बलकवडे यांनी संबंधितांना सुनावले.

Web Title: After the administrator's speech, the system started working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.