शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ घटना! तीन दिवसाच्या अंतराने म्हशीने दिला दुसऱ्या रेड्याला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 18:10 IST

या आश्चर्यजनक घटनेनंतर माने कुटुंबियासह गावातील नागरिकही अचंबित

अनिल पाटीलसरुड : अनेक वेळा म्हशीने तसेच गायीने एकाच दिवशी एका किंवा थोड्या वेळाच्या अंतराने  दोन जुळ्या रेडकांना जन्म दिल्याचे आपण ऐकले असाल. परंतू शाहूवाडी तालुक्यातील ठमकेवाडी येथील एका म्हशीने पहिल्या रेड्याला जन्म दिल्यानंतर तब्बल तीन दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या रेड्याला जन्म दिल्याची आश्चर्यजनक घटना गुरुवारी सकाळी घडली. या आश्चर्यजनक घटनेनंतर माने कुटुंबियासह गावातील नागरिकही अचंबित झालेत.ठमकेवाडी येथील शहाजी माने यांच्या मालकीच्या म्हशीने गेल्या सोमवारी पहाटे एका रेड्याला जन्म दिला. त्यानंतर तीन दिवस या म्हशीने विनातक्रार दुधही दिले. गुरुवारी सकाळी दुध काढल्यानंतर काही वेळाने पुन्हा दुसऱ्या रेड्याला जन्म दिला. माने जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस म्हशीच्या विण्याची प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक झाली आहे. पहिल्या रेड्या प्रमाणेच दुसरा रेडाही शरीराने पुर्ण वाढ झालेला आहे. तसेच म्हैसही सुरक्षित आहे.यापूर्वी म्हशीने किंवा गायीने एकाच दिवसात जुळ्यांना जन्म देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतू पहिल्या रेड्याला जन्म दिल्यानंतर तब्बल तीन दिवसाच्या अंतराने पुन्हा रेड्याला जन्म दिल्याची बहुधा ही पहिलीच घटना असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

काही वेळा गर्भाशयाच्या दोन शिंगांत दोन वेगवेगळी अंडी फलित होतात. एकाची वाढ उजव्या शिंगात तर दुसऱ्याची वाढ डाव्या शिंगात होते. दोन्ही गर्भाचे आयुष्यमान वेगवेगळे असल्याने अशा म्हशी पासुन जन्म होणाऱ्या रेड्याच्या जन्मामध्येही अंतर पडू शकते. ही घटना अत्यंत दुर्मिळ असून प्रामुख्याने अशा घटना क्वचितच पाहायला मिळतात. - डॉ . बी. एल. किटे, सहा. व्यवस्थापक (पशुसंवर्धन) गोकुळ दूध संघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूर