होन्याळीच्या सेवा संस्थेत ३५ वर्षांनंतर सत्तांतर

By Admin | Updated: March 9, 2016 00:48 IST2016-03-09T00:47:44+5:302016-03-09T00:48:12+5:30

परिवर्तन आघाडीला आठ, तर सत्तारूढ आघाडीला चार जागा

After 35 years of service in Honalii service institute | होन्याळीच्या सेवा संस्थेत ३५ वर्षांनंतर सत्तांतर

होन्याळीच्या सेवा संस्थेत ३५ वर्षांनंतर सत्तांतर

उत्तूर : होन्याळी (ता. आजरा) येथील श्री. भैरीदेव विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. भैरीदेव परिवर्तन आघाडीला आठ जागा, तर भैरीदेव सत्तारूढ विकास आघाडीला चार जागा मिळाल्या.
परिवर्तन आघाडीतून कर्जदार गट - मधुकर मारुती खाडे (२३४), जयसिंग तुकाराम जाधव (२३८), आनंदा विठोबा पाटील (२२५), गणपती जानबा पाटील (२२५) आनंदा लक्ष्मण ल. कांबळे (२२५), महिला राखीव गटातून इंदूबाई नारायण पाटील (२४७), इतर मागास गटातून राजाराम दत्तू सुतार (२५६), मागासवर्गीय गटातून दत्तात्रय गणपती कांबळे (२६१).
भैरीदेव सत्तारूढ विकास आघाडीतून कर्जदार गटातून वसंत जानबा पाटील (२४२), बाबूराव जानबा सरोळकर (२२४), संभाजी दत्तात्रय पाटील (२२१). महिला राखीव गटातून शकुंतला तानाजी पाटील (२४०), तर भटक्या विमुक्त गटातून काशिनाथ लिंबाजी डवरी (बिनविरोध) निवडून आले.
परिवर्तन आघाडीचे नेतृत्व शरद पाटील, आनंदाराव पाटील, काशिनाथ तेली यांनी, तर सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व वसंत पाटील, सागर सरोळकर यांनी केले. सहा. निबंधक अनिता शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)



दोन जागा १ मतांनी विजयी
सत्तारूढ आघाडीच्या संभाजी पाटील, शकुंतला पाटील हे एका मतांनी विजयी, तर परिवर्तन आघाडीचे प्रकाश कांबळे, शालन पाटील यांचा एका मतांनी पराभव झाला.

Web Title: After 35 years of service in Honalii service institute