शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षांनंतर घरी कन्यारत्न, हत्तीवरून मिरवणूक काढत चिमुकलीचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 12:09 IST

लेकीच्या स्वागतासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत, फुगड्या खेळत जल्लोषात पेढे वाटण्यात आले. रं

ज्योती पाटीलपाचगाव (जि. कोल्हापूर) : कोल्हापूरनजीकच्या पाचगावमध्ये एका कुटुंबात सुमारे ३५ वर्षांनंतर घरात जन्मलेल्या मुलीचे शनिवारी चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. लेकीच्या स्वागतासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत, फुगड्या खेळत जल्लोषात पेढे वाटण्यात आले. रंगीबेरंगी फुग्यांनी व आकर्षक फुलांनी सजवलेल्या घरात रांगोळीचा सडा व फुलांच्या पायघड्यांमध्ये लाडक्या ईरा या लेकीचा गृहप्रवेश करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या स्वागताची पाचगावसह जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. 

पुण्यातील आयटी कंपनीत असलेले गिरीश पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा या दाम्पत्याला २९ डिसेंबर २०२२ रोजी कन्यारत्न झाले. त्यांच्या कुटुंबात सुमारे ३५ वर्षांनंतर मुलगी जन्माला आल्याने आनंदाला पारावार उरला नाही. जन्मानंतर मामाच्या गावावरून पहिल्यांदाच शनिवारी पाचगाव येथे आपल्या घरी आलेल्या ईरा व तिच्या आईचे स्वागत हत्तीवरून स्वार होत, सनई-चौघड्यांच्या सुरात व फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले. स्वागत मिरवणुकीत पाटील कुटुंब, सर्व नातेवाईक व परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या.

आमच्या घरात ३५ वर्षांनी मुलगी जन्माला आली आहे. सर्व कुटुंब खूप आनंदी आहे. या आनंदात नातीचे स्वागत केले. मुलगा-मुलगी एकसमान आहेत. स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येकाकडून व्हायला पाहिजे. स्त्रीभ्रूणहत्या पाप आहे. हे पाप व्हायला नको, यासाठी जागृती झाली पाहिजे.आनंदी पाटील,मुलीची आजी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर