सहा जिल्ह्यांतील वकिलांचे आज ‘काम बंद’ आंदोलन

By Admin | Updated: December 12, 2014 00:33 IST2014-12-12T00:33:24+5:302014-12-12T00:33:44+5:30

सर्किट बेंच : उद्या ‘महालोक अदालत’वर बहिष्कार

Advocates of six districts today called 'Work Stop' movement | सहा जिल्ह्यांतील वकिलांचे आज ‘काम बंद’ आंदोलन

सहा जिल्ह्यांतील वकिलांचे आज ‘काम बंद’ आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याच्या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील वकील उद्या, शुक्रवारी लाक्षणिक ‘काम बंद’ आंदोलन करणार असून, शनिवारी (दि. १३) होणाऱ्या राज्यव्यापी ‘महालोक अदालत’वर बहिष्कार टाकणार आहेत, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी दिली.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर व सिंधुदुर्ग (पान १०वर)

मोटारसायकल रॅली
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या, शुक्रवारी सकाळी दहा वाजता सर्व वकील जिल्हा न्यायालयासमोर येतील. त्यानंतर कावळा नाका, व्हीनस कॉर्नर, बिंदू चौक, शिवाजी चौक ते टाऊन हॉल, जिल्हा न्यायालय, आदी मार्गांवरून मोटारसायकल रॅली काढून सर्किट बेंचप्रश्नी प्रबोधन करण्यात येणार आहे.

Web Title: Advocates of six districts today called 'Work Stop' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.