बेळगावमध्ये वकिलांचे उपोषण

By Admin | Updated: December 2, 2014 00:49 IST2014-12-02T00:42:31+5:302014-12-02T00:49:24+5:30

बेळगाव जिल्ह्यातील वकिलांनी आंदोलन छेडले आहे.

Advocates fasting in Belgaum | बेळगावमध्ये वकिलांचे उपोषण

बेळगावमध्ये वकिलांचे उपोषण

बेळगाव : कर्नाटक सरकार बेळगावमध्ये कर्नाटक प्रशासकीय लवादाच्या स्थापनेची घोषणा करण्यास विलंब लावत असल्यामुळे बेळगाव बार असोसिशनच्या चार वकिलांनी आज, सोमवारपासून उपोषण सुरू केले. सहा महिन्यांपूर्र्वी सरकारने आश्वासन दिले होते; पण अद्याप त्या आश्वासनाची पूतर्ता झाली नसल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यातील वकिलांनी आंदोलन छेडले आहे. सरकारवर दबावासाठी बेळगाव बार असोसिशनने ३ डिसेंबर रोजी बेळगाव ‘बंद’ची हाक दिली आहे. बेळगाव बार असोसिशनचे माजी अध्यक्ष अनिल मूळवाडमठ, बी .एस. हिरेमठ ,मुरगेंद्रगौडा पाटील व रमेश देशपांडे यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला

Web Title: Advocates fasting in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.