जाहिरात विभागाची बातमी - ‘मलाबार’तर्फे काेविड योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:17 IST2021-02-05T07:17:12+5:302021-02-05T07:17:12+5:30
कोल्हापूर : सुवर्णालंकार विक्री क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव असलेल्या येथील ‘मलाबार’ गोल्ड अँड डायमंडस्च्या वतीने बुधवारी कोविड संसर्गाच्या काळात ...

जाहिरात विभागाची बातमी - ‘मलाबार’तर्फे काेविड योद्ध्यांचा सन्मान
कोल्हापूर : सुवर्णालंकार विक्री क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव असलेल्या येथील ‘मलाबार’ गोल्ड अँड डायमंडस्च्या वतीने बुधवारी कोविड संसर्गाच्या काळात मोठ्या धाडसाने काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. ग्राहकांची आपुलकी जपणाऱ्या ‘मलाबार’ने महामारीच्या काळात रुग्णसेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करून सामाजिक जागरूकता, तसेच संवेदना दाखवून दिली.
कोल्हापूर : शहरातील कोविड महामारीच्या काळात सर्वोत्तम व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या डॉ. सोनाक्षी पाटील, डॉ. शीतल वारके, डॉ. मनीषा चव्हाण, डॉ. वर्षा शेवाळे, डॉ. दिशा माने, डॉ. अर्पिता खैरमोडे, डॉ. प्रीती जगताप, स्टाफ नर्स माधवी रुकडीकर, सुजाता कट्टी, छाया ठाकर, फार्मासिस्ट छाया निसर्गगंधा, वृषाली शिंगे यांचा मलाबारतर्फे डॉ. हेमलता कोटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कोविड विरुद्धच्या लढाईत एखाद्या योद्ध्यासारखी ही मंडळी लढली, त्याची दखल घेत ‘मलाबार’ने या योद्ध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यामुळे त्यांना निश्चितच काम करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा शब्दांत डॉ. हेमलता कोटकर यांनी ‘मलाबार’चे आभार मानले.
शोरूमचे व्यवस्थापक रवी पाटील यांनी स्वागत केले. यावेळी स्टाेअर हेड आबीद व्हीटी, डॉ. भरत कोटकर यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २७०१२०२१-कोल-मलाबार
ओळ - कोल्हापुरातील ‘मलाबार’ गोल्ड अँड डायमंडस्च्या वतीने बुधवारी कोविड संसर्गाच्या काळात कौतुकास्पद काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कोविड योद्ध्यांचा डॉ. हेमलता कोटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी रवी पाटील, आबीद व्हीटी उपस्थित होते.