शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शिक्षकांचे ‘जेल भरो’ प्रलंबित मागण्या मान्य करा : ...अन्यथा बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:36 IST

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन केले.

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन केले. या शिक्षकांनी महाविद्यालये बंद ठेवली. मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारने दोन दिवसांत सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी आंदोलन केले. हे सर्व शिक्षक सकाळी अकरा वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जमले. या ठिकाणी ‘शिक्षणमंत्र्यांचा धिक्कार असो,’ ‘आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत,’ ‘प्रलंबित मागण्यांची पूर्तता झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष सी. व्ही. जाधव, सचिव अविनाश तळेकर, शिक्षक नेते दादा लाड यांची भाषणे झाली. यानंतर आंदोलनातील शिक्षकांनी ‘जेल भरो’ आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षक सहभागी झाले.

सांगलीत शनिवारी धरणे आंदोलनसांगली : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह राज्यातील सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली.सांगलीत दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रलंबित मागण्या अशानोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.संचमान्यतेतील त्रुटी दूर करून मान्यता द्या.अर्धवेळ शिक्षकांना सेवासंरक्षण द्या.दि. २ मे २०१२ नंतरच्या पायाभूत रिक्त पदावर विद्यार्थिहितासाठी नियुक्त शिक्षकांच्या मान्यता, नियुक्ती दिनांकापासून वेतन मिळावे.सन २०११-१२ पासून प्रस्तावित झालेल्या पदांना मंजुरी तत्काळ मिळाली पाहिजे.कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र करावे. 

प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी महासंघाच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबरपासून आंदोलन पुकारले आहे. याचा चौथा टप्पा म्हणून आम्ही ‘जेल भरो’ केले. येत्या दोन दिवसांत सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करावी; अन्यथा महासंघाच्या आदेशानुसार बारावीच्या परीक्षेच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत.- अविनाश तळेकर, सचिव, कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर