कर्नाटकात उद्यापासून प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST2021-05-10T04:23:53+5:302021-05-10T04:23:53+5:30

कोगनोळी : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्नाटक राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारने राज्यात १० मे ते २४ ...

Admission to Karnataka closed from tomorrow | कर्नाटकात उद्यापासून प्रवेश बंद

कर्नाटकात उद्यापासून प्रवेश बंद

कोगनोळी : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्नाटक राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारने राज्यात १० मे ते २४ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी शेजारी राज्यांमधून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्वच वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

कर्नाटक शासनाने यापूर्वीच राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वांनाच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. आता मात्र नव्याने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांनाच राज्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील तपासणी पथकाद्वारे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनांनाच राज्यात प्रवेश दिला जात होता. परंतु, उद्या दिनांक १०पासून फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच वाहनांना येथून परत मागे पाठवले जाणार आहे. या तपासणी नाक्यावर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

फोटो ओळ : कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्यांना यापूर्वीच प्रवेश बंद करण्यात आला आहे.

छाया : बाबासो हळीज्वाळे

Web Title: Admission to Karnataka closed from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.