अशोकराव माने पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश सुविधा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:18+5:302021-07-04T04:17:18+5:30
कागदपत्रांची पडताळणी व त्याची निश्चिती करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर २० जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. २७ ...

अशोकराव माने पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश सुविधा केंद्र
कागदपत्रांची पडताळणी व त्याची निश्चिती करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर २० जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. २७ ते २९ जुलै दरम्यान गुणवत्ता यादी मधील त्रुटीसंदर्भात तक्रार करण्यास मुदत देण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी दहावीच्या गुणपत्रिकेची आवश्यकता नाही. विद्यार्थी केवळ आपल्या १० वीच्या आसन क्रमांकच्या आधारे प्रवेश निश्चित करू शकतो. मोजक्या कागदपत्रांच्या आधारे आणि सुटीच्या दिवशीही सुविधा केंद्र चालू असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य वाय. आर गुरव यांनी केले. यावेळी सुविधा केंद्र समन्वयक पी. एम. पाटील आदीसह विभागप्रमुख उपस्थित होते.