शर्करातंत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:32+5:302021-07-07T04:31:32+5:30
अनिल गायकवाड यांना संयुक्त कॉपीराईट प्रदान कोल्हापूर :भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅॅनेजमेंटमध्ये डॉ. अनिल गायकवाड यांच्या सिक्युरिटी सॉफ्टवेअरसाठी संयुक्त ...

शर्करातंत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
अनिल गायकवाड यांना संयुक्त कॉपीराईट प्रदान
कोल्हापूर :भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅॅनेजमेंटमध्ये डॉ. अनिल गायकवाड यांच्या सिक्युरिटी सॉफ्टवेअरसाठी संयुक्त कॉपीराईट प्रदान करण्यात आला. हे सॉफ्टवेअर प्रा. जयदीप पाटील, डॉ. संग्राम पाटील यांच्यासह डॉ. गायकवाड यांनी बनवले आहे. याबद्दल त्यांचा सत्कार प्रभारी संचालक डॉ. रवींद्र मराठे यांच्या हस्ते करण्यात आला.
कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे वृक्षारोपण
कोल्हापूर : येथील ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे रविवारी राजाराम तलाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या सोसायटी आणि राजाराम तलाव जलतरण मंडळाच्या सदस्यांकडून वड, पिंपळ, जांभूळ आदी शंभर रोपे लावण्यात आली. या उपक्रमात डॉ. शहापूरकर, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विजय कस्सा, प्रतापसिंह वरूटे, मानसिंगराव घाटगे, विश्वनाथ मगदूम, पी. बी. शहा, सुनील नाडकर्णी, सुरेश देशपांडे, सचिव डॉ. बसवराज कडलगे, सौरभ गांधी, ॲड. सुनील धुमाळ, डॉ. संजय देशपांडे, डॉ. पेंढारकर आदी सहभागी झाले.