शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आवाडेंशी वाद भोवला, इचलकरंजी महापालिका प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचा पदाचा कार्यभार काढला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:42 IST

बदलीच्या विरोधात दिवटे यांनी प्रशासकीय न्यायाधीकरण बोर्डाकडे धाव घेतली. त्यामुळे बदली रद्द होऊन त्यांना कायम ठेवण्याचे आदेश बोर्डाने दिले होते

इचलकरंजी : महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडील प्रशासकपदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. प्रशासकपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी राज्यपालांच्या आदेशाने दिले आहेत. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव ही नियुक्त केल्याचे नमूद केले असले, तरी या कारवाईच्या माध्यमातून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिवटे यांना चाप लावल्याची चर्चा शहरातील राजकीय वतुर्ळात रंगली आहे.महापालिकेत ६ जुलै २०२३ ला ओमप्रकाश दिवटे यांची आयुक्त तथा प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. माजी मंत्री आवाडे आणि आयुक्त दिवटे यांच्यात वादही झाला होता. त्यानंतर दिवटे यांच्या वर्षपूर्तीला अवघे काही दिवस बाकी असताना पुन्हा त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. त्या बदलीच्या विरोधात दिवटे यांनी प्रशासकीय न्यायाधीकरण बोर्डाकडे धाव घेतली. त्यामुळे बदली रद्द होऊन त्यांना कायम ठेवण्याचे आदेश बोर्डाने दिले होते. त्यानुसार त्यांच्याकडे महापालिकेचा कार्यभार कायम होता तसेच पालिकांच्या निवडणुका न झाल्याने महापौरपदाच्या अधिकाराचे प्रशासकपदही आयुक्तांकडे होते. मात्र, बुधवारी त्यांच्याकडून तडकाफडकी प्रशासक हे पद काढून घेण्यात आले. त्याजागी प्रशासकपदी जिल्हाधिकारी येडगे यांची नियुक्ती केली आहे. प्रशासकपदाचा कार्यभार तातडीने स्वीकारावा आणि आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे, असेही शासन आदेशात नमूद केले आहे. या निर्णयामुळे यापुढे आयुक्त दिवटे यांना कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जिल्हाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी लागणार आहे. राज्यातील २८ महापालिकांमध्ये आयुक्तांकडे प्रशासक पदाचा कार्यभार असून आयुक्तांकडील या पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविल्याची इचलकरंजी महापालिकेतील ही पहिलीच घटना आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPrakash Awadeप्रकाश आवाडेcommissionerआयुक्तcollectorजिल्हाधिकारी