शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विशाळगडावरील ७० अतिक्रमणे प्रशासनाने बंदोबस्तात हटविली, २१ संशियतांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 12:19 IST

जाळपोळीत ५६ कुटुंबांचे नुकसान

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहूवाडी) येथील किल्ल्यावर व गजापूर आणि मुसलमानवाडीतील विशिष्ट समाजाच्या घरावर दगडफेक, हल्ले करून जाळपोळ केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांत सुमारे ६० जणांवर सोमवारी गुन्हे दाखल झाले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे आणि चित्रीकरण पाहून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. त्यातील २१ जणांना अटक केली. या जाळपोळीत ५६ कुटुंबांचे प्रापंचिक साहित्याचे तसेच ७ कार, ३ मोटारसायकली मिळून सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सकाळी गडावर गेली आणि त्यांनी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू केली. त्यामध्ये १० खातेदारांच्या भाड्याने दिलेल्या खोल्या, दुकानांची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. दरम्यान, रविवारच्या घटनेस सर्वांनीच पोलिस व जिल्हा प्रशासनास जबाबदार धरले. त्यांनी पुरेशी दक्षता न घेतल्यानेच ही घटना घडल्याचा आरोपही काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांनी केला. त्यांनी या घटनेमुळे आपल्याला तीव्र वेदना झाल्याचे म्हटले आहे. नुकसानग्रस्तांना आधार देण्यासाठी ते आज मंगळवारी गडावर जाऊन आजूबाजूच्या गावांतील लोकांना भेटणार आहेत. सायंकाळी कोल्हापुरात झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही या घटनेचा निषेध करून आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कुणी सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्यास तो वेळीच रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले.

राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी पीडितग्रस्तांची घेतली भेटया दंगलीस माजी खासदार संभाजीराजे हेच जबाबदार असल्याने त्यांनाच अटक करावी, अशी मागणी कोल्हापुरातील मुस्लीम बोर्डिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली करावी, अशी मागणीही जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन देऊन केली. मुस्लीम समाजाने या घटनेचा दसरा चौकात निदर्शने करून जोरदार निषेध केला. या हल्ल्यातील संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी कोल्हापुरात केली. त्यांनी सायंकाळी विशाळगडावर जाऊन पीडितग्रस्तांची भेट घेतली.

यापूर्वी अतिक्रमण काढण्यावर कोणाचा दबाव होता? विशाळगडावर रविवारी जी घटना घडली, त्याला सरकार, जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करतानाच, मी गेल्या दीड वर्षापासून अतिक्रमण काढा म्हणून मागे लागलो होतो, त्याची दखल घेतली नाही. शिवभक्तांचा उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अतिक्रमण काढण्याचे आदेश देत आहात. मग यापूर्वी ते काढण्यावर कोणाचा दबाव होता? असा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. त्यानंतर ते स्वत:हून शाहूवाडी पोलिसांत हजर झाले परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.संभाजीराजेंवर गुन्हा दाखल नाहीशिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा मला अटक करा, या मागणीसाठी संभाजीराजे यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात चार तास ठाण मांडले होते. मात्र, पोलिस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, असे सांगितले.तीन दिवसांची कोठडीयाप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी ६० जणांवर गुन्हे दाखल केले. २१ जणांनी पोलिसांनी अटक करून शाहूवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस