शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

स्वच्छतागृहावरून ‘प्रायव्हेट’चे प्रशासन धारेवर

By admin | Updated: October 21, 2015 00:40 IST

पालकांनी विचारला जाब : शाळेतील एका विद्यार्थ्यास डेंग्यू, आठ मुले रुग्णालयात; उपाय न योजल्यास आंदोलन

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीमधील विविध शाखांमध्ये अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे अनेक मुले आजारी पडत आहेत. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणीच दखल न घेतल्याने संतप्त पालकांनी मंगळवारी सकाळी प्रशासनाला सुमारे दोन तास धारेवर धरले. यावेळी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन पालकांना दिले. उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी पालकांनी दिला. खासबाग मैदानाजवळील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात विविध आठ शाखा आहेत. त्यामध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुला- मुलींसाठी एकूण या ठिकाणी ३२ स्वच्छतागृहे आहे. मात्र, ही स्वच्छतागृहे अपुरी पडत असून वेळोवेळी त्यांची स्वच्छता होत नसल्याने वर्गामध्ये दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे अनेक मुलांना त्याचा त्रास होत आहे. मुलांना नाकाला रुमाल लावून वर्गात बसावे लागते. याबाबत वारंवार तक्रार करूनसुद्धा प्रशासनाकडून दखल न घेता पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती. स्वच्छतागृहे स्वच्छ नसल्याने या शाळेतील आठ मुले रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर कुणाल महेंद्र थरवल या विद्यार्थ्याला डेंग्यू झाल्याचे निदान येताच पालक संप्तत झाले.मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पालक शाळेत जमले. त्यांनी याबाबत शिक्षकांना जाब विचारला. त्यांनी ही बाब प्रशासनातील पदाधिकाऱ्यांना सांगू, असे आश्वासन दिले. मात्र, पालकांनी पदाधिकारी येत नाहीत तोपर्यंत येथून कोणीही हलणार नाही, अशी भूमिका घेत मुख्य प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली. सुमारे तासाभरानंतर सहकार्यवाहक बी. जी. देशपांडे शाळेत येताच पालकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आम्हाला आश्वासन नको तत्काळ कार्यवाही पाहिजे, अशी भूमिका पालकांनी घेतल्याने पुन्हा गोंधळ झाला. याचदरम्यान संस्थेचे चेअरमन डॉ. अजित भागवत हे येताच पालकांनी त्यांनाही धारेवर धरले. भागवत यांनी संबंधित विद्यार्थी ज्या रुग्णालयात आहेत त्यांची विचारपूस केली जाईल, तसेच तत्काळ स्वच्छतागृहाशेजारील असणारे वर्ग हलविण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर पालक शांत झाले.दरम्यान, शाळेमध्ये बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या विस्तार अधिकारी एन. एस. गुरसाळे या आल्या होत्या. यावेळी पालकांनी त्यांना येथील स्वच्छतागृहांची पाहणी करण्यास सांगितले. यावेळी गुरसाळे यांनी स्वच्छतागृहांची पाहणी करून प्रशासनास येथील बालवाडी व तिसरीचे वर्ग स्वच्छतागृहापासून इतरत्र हलविण्याबाबत सूचना दिल्या. आंदोलनात जयाजी घोरपडे, जयकुमार शिंदे, बाबासाहेब पाटील, फिरोज सरगूर, महेंद्र साळोखे, मंजिरी कुलकर्णी, केतकी देवधर, शिल्पा कांबळे, अनिता शिंदे, शिल्पा मगदूम, स्नेहा सरपोतदार, पल्लवी नलवडे, ज्योती यादव, प्रिया दाबाडे, शीतल खोराटे, दीपाली वंदुरे, शिदीन वंदुरे, शिरीन मोमीन, शिल्पा साबळे, दीपाली काटे, प्रणिता जाधव, माधुरी हावळ, श्वेता चौगुले, सुप्रिया जाधव, विदुला बुगड, फातिमा सय्यद, वैभवी मान, अनेक पालक सहभागी होते. मुलांना त्रास दिला तर बघाशाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आम्ही आंदोलन केले आहे. आंदोलनात सहभागी पालकांच्या पाल्यास जर शाळा प्रशासनाने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा यावेळी पालकांनी प्रशासनास दिला. शाळा प्रशासनास जागशाळेतील विद्यार्थी ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याठिकाणी संस्थेचे चेअरमन डॉ. अजित भागवत यांनी भेट देत त्यांच्या पालकांशी व डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी आंदोलन केल्यानंतरच शाळा प्रशासन जागे झाले काय?, अशी चर्चा पालकांच्यामधून व्यक्त होत होती. तत्काळ स्वच्छतासकाळी आंदोलन सुरू असताना भयभीत कर्मचाऱ्यांनी तत्काळ जादा फिनेल टाकून स्वच्छतागृहे स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. काही मुले डब्यातील अन्न स्वच्छतागृहात टाकत असल्याने पाणी तुंबते. याबाबत काही करता येईल हे पाहिले जाईल. स्वच्छतागृहाशेजारील वर्ग तत्काळ अन्यत्र हलविण्यात येईल. स्वच्छतागृह शाळा परिसरात कुठे हलविता येईल, याचीही पाहणी करण्यात येईल.- डॉ. अजित भागवत, चेअरमन, प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीमाझा मुलगा चौथीत आहे. काही दिवसांपूर्वी वर्गात त्याला ताप आला. त्यांची वैद्यकीय तपासणी के ल्यावर डॉक्टरांनी त्याला डेंग्यू झाल्याचे सांगितले. आज ही बाब मी शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणली. तर मलाच विचारतात तुमच्या मुलाला डेंग्यू झाला आहे त्याला काय पुरावा आहे. प्रशासनाचे असे वागणे चुकीचे आहे.- महेंद्र थरवल (पालक)