शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ४३ शासकीय कार्यालयांचा कारभार भाड्याच्या इमारतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 15:01 IST

शेंडा पार्कातील इमारत झाल्यानंतर सोय

कोल्हापूर : स्व मालकीची इमारत नसल्याने शहरातील ४३ शासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत. इमारतीच्या भाड्यापोटी दरमहा लाखो रुपये शासनास संबंधित इमारत मालकास द्यावे लागत आहे. यामुळे शासन शेंडा पार्क येथे भव्य अशी इमारत बांधणार आहे.शासकीय विभाग मंजूर झाल्यानंतर पहिल्यांदा कर्मचारी नियुक्त होतात. कार्यालय सुरू होते. पण संबंधित विभागाची इमारत बांधण्यास विलंब होतो. त्यामुळे भाड्याची इमारत घेऊन तेथून कामकाज केले जाते. इमारतीसाठी शहरात पुरेशा प्रमाणात जमीन मिळत नाही. जमीन मिळाली तरी इमारतीसाठी निधी मिळत नाही. म्हणून वर्षानुवर्षे भाड्याच्या इमारतीमध्ये शासकीय कार्यालय सुरू असते.

भाड्याच्या जागेतील प्रमुख विभाग- प्रादेशिक सहसंचालक (साखर), नगररचना विभागाचे उपसंचालक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, करवीरचे तालुका कृषी अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, जिल्हारेशीम कार्यालय, करवीर उपविभागीय कृषी अधिकारी, सहायक कामगार आयुक्त, नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपनिबंधक सहकारी संस्था, सहाय्यक संचालक, आरोग्य विभाग, प्रादेशिक मोसम विज्ञान केंद्र, कोल्हापूर जिल्हा माताडी आणि असंरक्षित कामगार मंडळ, मुख्य वनसंरक्षक, शासकीय धान्य गोदाम.कोणत्या भागात कार्यालय त्या प्रमाणे भाडेशहराच्या कोणत्या भागात कार्यालय आहे, त्या भागातील भाड्याची आकारणी इमारत मालक करतो. यामुळे राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क परिसरात भाडे अधिक आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले.शासकीय इमारत नसल्याने गैरसोयशासकीय इमारत नसल्याने अभ्यागतांना चांगल्या सेवा, सुविधा देता येत नाही. दिव्यांगांना रॅम्प तयार करता येते नाही. जागा मालकाची जितकी जागा आहे, तितक्या जागेतच कार्यालयाचे कामकाज चालते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार