हेकेखोरपणापुढे प्रशासन हतबल, रस्त्यावर पुन्हा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST2021-06-04T04:18:55+5:302021-06-04T04:18:55+5:30
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने सर्वजण घरात बसून होते कोरोनाचा आकडा कमी झाल्याने नागरिकांच्या मनातील भीती कमी होऊन ...

हेकेखोरपणापुढे प्रशासन हतबल, रस्त्यावर पुन्हा गर्दी
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने सर्वजण घरात बसून होते कोरोनाचा आकडा कमी झाल्याने नागरिकांच्या मनातील भीती कमी होऊन घरात बसून असणारे नागरिक विविध कारणास्तव उगाचच घराबाहेर पडत असून कोरोना गेला या अविर्भावात हॉटेल्स, चहाच्या गाड्या, खाद्यपदार्थांच्या गाड्यावर पार्सल नेण्यासाठी गर्दी वाढल्याचे चित्र आहे. येथे सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन, मास्कचा वापर नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी कारणाविना नागरिक रस्त्यावर गर्दी करत असून मॉर्निंग वॉकला विनाकारण बाहेर पडणे पुन्हा सुरू झाले आहे.
कोरोनाची पाहिली लाट येऊन गेल्यानंतर नियमांचे पालन न करता नागरिक घराबाहेर पडले परिणामी दुसरी लाट वेगात पसरली ज्यात रुग्ण संख्या व मृत्यूदर हाताबाहेर गेला. बाजारपेठ भाजीपाला खरेदीसाठी सुरक्षित अंतराचे नियम धाब्यावर बसवत गरजेशिवाय गर्दी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून रस्त्यावर विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यांना आळा घालताना प्रशासन हतबल बनल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर नागरिकांची बेफिकिरी अंगलट आली ज्यामुळे कोरोना संसर्ग वाढला कित्येक रुग्णांनी आजार अंगावर काढत घरगुती उपचार केले. काहींनी आजार लपविला ज्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढली बेड कमी पडून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला. नियमांची पायमल्ली केल्यास तिसरी भयावह लाट येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावधानता पाळणे क्रमप्राप्तच आहे.