आजी-माजी मुख्यमंत्र्यांमुळे प्रशासनाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST2021-07-31T04:24:52+5:302021-07-31T04:24:52+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पाहणीसाठी एकाचदिवशी आजी-माजी मुख्यमंत्री, मुख्य सचिव कोल्हापूर दौऱ्यावर आल्याने जिल्हा आणि पाेलीस प्रशासनाला या ...

Administration exercise due to grandparents and former chief ministers | आजी-माजी मुख्यमंत्र्यांमुळे प्रशासनाची कसरत

आजी-माजी मुख्यमंत्र्यांमुळे प्रशासनाची कसरत

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पाहणीसाठी एकाचदिवशी आजी-माजी मुख्यमंत्री, मुख्य सचिव कोल्हापूर दौऱ्यावर आल्याने जिल्हा आणि पाेलीस प्रशासनाला या दौऱ्याचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र एकाचवेळी दोन्हीकडील ही परिस्थिती सांभाळत हे दौरे पार पाडण्यात प्रशासनाला यश आले.

कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत, याची गेल्या दिवसांपासून चर्चा होती; मात्र अधिकृत दौरा आला नव्हता. अखेर गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारचा दौरा आला. त्याआधीच एक दिवस माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा निश्चित झाला होता. एकाचदिवशी आणि एकाचवेळी राज्याच्या प्रमुख दोन नेत्यांच्या दौऱ्यांचे नियोजन प्रशासनाला करावे लागले. त्यांच्या बैठकांसाठी गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील पुराची वस्तुस्थिती मांडणारे अहवाल तयार केले जात होते. त्यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अधिकारी-कर्मचारी कार्यालयात बसून होते.

दोनही नेत्यांच्या दौऱ्याचे नियोजन, ते किती वाजता कुठे येणार आहेत, त्यांच्यासोबत कोणत्या ठिकाणी कोणकोणते अधिकारी असतील, हे ठरवण्यात आले होते. शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत जिल्ह्यातील तीनही मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयुक्त असा अधिकाऱ्यांचा ताफा होता. फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी तहसीलदार, प्रांताधिकारी होते. शुक्रवारी त्यांच्यासोबत जिल्हा उपनिबंधक, समाजकल्याण आयुक्त, संपर्क अधिकारी होते. पोलीस बंदोबस्तासाठी दोन टीम करण्यात आल्या. मुख्यमंत्री शाहूपुरीत १ वाजता येणार होते; मात्र ते नियोजित वेळेच्या आधीच अर्धा तास आले आणि तिथेच मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांचा ताफा आणि झालेली गर्दी हाताळताना पोलिसांची मात्र तारांबळ उडाली.

---

Web Title: Administration exercise due to grandparents and former chief ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.