टोलविरोधी कृती समितीचा महामेळावा स्थगित

By Admin | Updated: December 29, 2014 00:29 IST2014-12-29T00:27:39+5:302014-12-29T00:29:12+5:30

चंद्रकांत पाटील : कोल्हापूर टोलमुक्तीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

The adjournment of anti-poll committee | टोलविरोधी कृती समितीचा महामेळावा स्थगित

टोलविरोधी कृती समितीचा महामेळावा स्थगित

कोल्हापूर : कोल्हापूर टोलमुक्त करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. टोलमुक्तीसाठी सर्व पर्यायांची चाचपणी सुरू असून, महिन्याभरात टोल हद्दपार करण्याचे आश्वासन आज, रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने मंगळवार (दि. ३०)चा महामेळावा स्थगित करण्याचा निर्णय टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे.
भाजप सरकारही टोलमुक्तीसाठी चालढकल करीत असल्याने टोलविरोधी कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे. याकरिता मंगळवारी (दि. ३०) महामेळाव्याचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री पाटील यांच्याशी कृती समितीच्या सदस्यांनी चर्चा केली. ते म्हणाले, कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेऊन टोलला सरकारने स्थगिती दिली तर कंपनी न्यायालयात जाते व टोल सुरू होतो. आय. आर. बी. कंपनीने प्रकल्पाच्या किमतीबाबत सरकारकडे विचारणा केलेली आहे.

Web Title: The adjournment of anti-poll committee