शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

Kolhapur: आदित्य नलवडेची स्टॅनफोर्ड विद्यापीठात निवड, शिक्षणासह सर्व सुविधा मिळणार मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 17:33 IST

ऑनलाईन दिलेल्या परिक्षेत ९९ टक्के गुण

शिवाजी सावंत गारगोटी: अमेरिकास्थित जगातील नामवंत स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी भुदरगड तालुक्यातील सतरा वर्षीय विद्यार्थ्याची निवड झाली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या विद्यापिठात निवड होणारा जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे. गारगोटी येथील आदित्य विक्रम नलवडे (वय १७) याची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठात "अंडर ग्रॅज्युएट कॉम्प्युटर सायन्स प्रोग्रॅमसाठी" निवड झाली आहे. चार वर्षांसाठी एकूण शैक्षणिक शुल्क ९८ टक्के माफ आहे. जून २०२३ मध्ये त्याने याबाबतच्या ऑनलाईन दिलेल्या परिक्षेत त्याला ९९ टक्के गुण मिळाले होते. आदित्यचे वडील सैन्य दलात अधिकारी तर आई अश्विनी या गृहिणी आहेत. आदित्यचे संपूर्ण शिक्षण सैनिक शाळेत झाले आहे. जम्मू काश्मिर,अंदमान, गुजरात, अरुणाचल प्रदेश, पंजाब, पुणे येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्याने शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. त्याने कोणतीही खासगी शिकवणी, शैक्षणिक मार्गदर्शन न घेता स्वत:च्या ज्ञानावर हे यश मिळवले आहे. याच सोबत मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत व पाली भाषा अवगत आहेत. आतापर्यंत त्याने सुमारे एक हजार पुस्तके वाचली आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयावर तो एक तास व्याख्यान देऊ शकतो. त्याने ‘ब्लॉकचेन’ या कार्पोरेट कंपन्यांशी संबंधीत दहावी पासूनच ऑनलाईन काम केले आहे. कंपन्यांना ब्लॉग लिहून देणे, मार्गदर्शन करणे अशी ऑनलाईन कामे करून त्याने स्वत:चा रोजगार निर्माण केला. तो बास्केट बॉलचा उत्तम खेळाडू असून त्याला सामाजिक उपक्रमांची, जनावरांची आवड आहे.वृध्दांना मदत,व्यायाम व व्यासंगी आदित्यची ग्रहणशक्ती अफाट आहे.कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठ हे ८ हजार १८० एकरात असून येथे राहणे, जेवण याची पंचतारांकीत सोय आहे.आदित्यला शिक्षणासह पुस्तके सुध्दा माफ केलेल्या शिष्यवृत्तीतून दिली जाणार आहेत. या विद्यापीठात उद्योगपती मुकेश अंबानी, इलॉन मस्क, रतन टाटा, अजिज प्रेमजी, ऋषी सुनक, अक्षता मूर्ती अशा दिग्गजांनी शिक्षण घेतले आहे. आदित्य सप्टेंबरमध्ये शिकण्यासाठी अमेरिकेला जाणार आहे. 

मला वाटतं मोबाईलवर चांगलं - वाईट दोन्ही प्रकारचं ज्ञान मिळते परंतु माहिती व नवनवीन शिकण्यासाठी सर्वांनी मोबाईलकडे बघितले पाहिजे. ऑनलाईन पुस्तके,वाचन,लिहिणे,माहिती मिळवणे,नवनविन कौशल्ये शिकणे मोबाईलमुळे सहज शक्य आहे.गेम व इन्स्टा रिलमध्ये आजच्या मुलांनी फुकट वेळ वाया घालवू नये. - आदित्य विक्रम नलवडे (विद्यार्थी, स्टैनफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCaliforniaकॅलिफोर्नियाEducationशिक्षण