शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पंचगंगेकाठी गाळात पाच दिवस अडकला, नशीब बलवत्तर म्हणून वाचला; आदित्य बंडगरचा जीवघेणा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 13:48 IST

पोटात अन्नाचा कणही नाही, पाणी नाही, मदतीसाठी कोणीही नाही, समोर मृत्यू दिसत असतानाही त्याने हार मानली नाही

कुरुंदवाड :  गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला शिरढोण (ता शिरोळ) येथील शाळकरी मुलगा आदित्य मोहन बंडगर (वय १९) शुक्रवारी पंचगंगा नदी काठी खोल खड्रेड्यात व्हाईट आर्मी, रेस्कू फोर्सच्या जवानांना सुखरूप सापडला. दहा ते बारा फूट खोल खड्डा, झाडी, मगर, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर, पोटात अन्नाचा कणही नाही, पाणी नाही, मदतीसाठी कोणीही नाही, समोर मृत्यू दिसत असतानाही हार न मानता मदतीसाठी कोणीतरी येतील या आशेवर जगणारा आदित्य अखेर नशीब बलवत्तर म्हणून सुखरूप परतला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकासह, चार दिवसांपासून शोधकार्य राबविणाऱ्या पथक, पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला.इयत्ता अकरावीत शिकणारा आदित्य सोमवारी (दि. १८) अचानक बेपत्ता झाला होता. शोधूनही सापडत नसल्याने नातेवाईकांनी कुरुंदवाड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. मात्र मंगळवारी आदित्यचे चप्पल शिरढोण पंचगंगा नदी घाटाजवळ आढल्याने नदीत पडला असल्याची शंका उपस्थित करुन रेस्कू फोर्सच्या जवानांनी चार दिवसांपासून बोटीच्या सहाय्याने पंचगंगा नदी पात्रात शोध घेत होते.मात्र सापडत नसल्याने ड्रोनचाही वापर केला होता. रेस्कू फोर्सच्या जवानांनी शुक्रवारीही शोध मोहीम सुरुच ठेवली होती. यावेळी काहीजन नदीकाठी असलेल्या जयहिंद सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या जॅकवेल लगत असलेल्या खोल खड्ड्यातून बारीक आवाजात मदतीसाठी हाका मारत असल्याचे ऐकू आल्याने काही युवकांनी खड्यात डोकावून पाहताच आदित्य असल्याचे दिसले. त्यामुळे रेस्कू फोर्सचे जवान, नातेवाईक, व इतर लोकांनी खड्यात उतरुन त्याला बाहेर काढले. पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा कणही नाही, पाणी नाही त्यामुळे अंगात थकवा होता. बोलण्यासाठी ताकदही नाही आणि भेदरलेल्या स्थितीत असल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात घेऊन गेले. शोध मोहिमेत रेस्क्यू फोर्सचे हैदरअली मुजावर, व्हाईट आर्मी टीमचे प्रदीप ऐनापुरे,नितेश व्हणकोरे,निशांत गोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.नशिब बलवत्तर म्हणून..नदी पात्रात शोधूनही आदित्य सापडत नसल्याने रेस्कूच्या जवानांनी नदी पात्रात ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबविली होती. यावेळी नदीपात्रात ड्रोनमध्ये मगर दिसली होती. त्यामुळे आदित्य मगरीचा शिकार तर झाला नसेल ना? अशी शंकाही व्यक्त केली जात होती. मात्र अशा जिवघेण्या संकटातून आदित्य सुखरूप सापडल्याने त्याच्या नशिब बलवत्तरची चर्चा होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर