शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'चांद्रयान-२' मोहिमेत सीमाभागातील केरबा लोहारांचे अतुलनीय योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 20:08 IST

देशाचे सर्वोच्च स्वप्न असलेल्या चांद्रयान मोहिमेबद्दल देशभर भारतीय अवकाश संशोधन संस्थेवर (इस्त्रो) कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ठळक मुद्देचांद्रयान मोहिमेत आडीच्या केरबा लोहारांचा सहभागवरिष्ठ संशोधक म्हणून २५ वर्षे इस्त्रोत काम

कोल्हापूर : देशाचे सर्वोच्च स्वप्न असलेल्या चांद्रयान मोहिमेबद्दल देशभर भारतीय अवकाश संशोधन संस्थेवर (इस्त्रो) कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मोहिमेत सहभागी असलेल्या निपाणीजवळच्या आडी गावचे सुपुत्र केरबा लोहार यांचे सीमाभागात कौतुक होत आहे.४७ वर्षीय केरबा लोहार यांचे प्राथमिक शिक्षण आडी येथील शाळेत झाले. सौंदलगा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बेळगावच्या शासकीय पॉलिटेक्नीकमध्ये डिप्लोमा केला.जिद्दीने शिक्षण घेत त्यांनी १९९४ मध्ये तांत्रिक सहाय्यक म्हणून भारतीय अवकाश संशोधन संस्थेत नोकरीसाठी अर्ज केला. नोकरीत असतानाही बंगळूरुच्या बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधून एमईचे शिक्षण पूर्ण केले. ते गेली २५ वर्षे या संस्थेत काम करत असून सध्या ते वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत आहेत.केरबा लोहार यांनी इस्त्रोमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. चांद्रयानची पहिली मोहिम असो, की मंगलयान, जीएसएलव्हीचे प्रक्षेपण असो लोहार यांची भूमिका महत्वाची होती. दुस-या चांद्रयान मोहिमेतही त्यांचा वाटा सिंहाचा आहे. या मोहिमेसाठी उपग्रहामध्ये आॅर्बिट, लँडर आणि रोव्हरचे काम महत्वाचे आहे. या तीन्ही भागासाठी लागणारे सेन्सर डिझाईन करण्याचे महत्वाचे काम केरबा यांच्याकडे आहे.

१९७२ मध्ये जन्मलेल्या केरबा यांचे आई, वडील आणि भाउ आणि त्यांचे कुटूंबिय आडी येथेच वास्तव्यास आहेत. केरबा हे बंगळूरुमध्ये पत्नी आणि मुलासह राहतात. वेळोवेळी ते गावी येत. चांद्रयान मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाल्यापासून मात्र ते गावी आलेले नाहीत.

गेल्यावर्षी दत्तजयंती आणि श्रावण महिन्यात ते गावी येउन आईवडीलांची भेट घेउन गेले होते. वडील पूर्वी लोहारकाम करत. त्यातूनच त्यांनी मुलांना शिकविले. त्यांचे बंधू शिवाजी हे जवळच्या गजबरवाडी येथील शाळेत शिकवतात. चांद्रयान मोहिमेतील त्यांच्या सहभागामुळे आडीसारख्या गावात त्यांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :isroइस्रोkolhapurकोल्हापूरChandrayaan 2चांद्रयान-2