हलकर्णी आरोग्य केंद्रात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:35+5:302021-05-12T04:25:35+5:30
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी नुकतेच रुजू झाले आहेत. गोकुळ निवडणूक मेळाव्यासाठी आलेले पालकमंत्री ...

हलकर्णी आरोग्य केंद्रात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी रुजू
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी नुकतेच रुजू झाले आहेत. गोकुळ निवडणूक मेळाव्यासाठी आलेले पालकमंत्री सतेज पाटील यांना हलकर्णी परिसरातील सरपंचांनी निवेदन देत याकडे लक्ष वेधले होते. त्याचा तातडीने पाठपुरावा करत भागातील सरपंच यांना दिलेला शब्द पाळत अंकिता त्राबक यांची हलकर्णी येथे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी म्हणून वर्णी लागली आहे.
२२ गावांचा ताण असलेल्या हलकर्णी केंद्रासाठी ही मोठी जमेची बाजू आहे. हलकर्णीच्या सरपंच योगिता संगाज यांनी नूतन अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी नीलिमा धबाले यांच्यासह भागातील सरपंच उपस्थित होते.
------------------------
फोटो ओळी : हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या अंकिता त्राबक यांचे स्वागत करताना मान्यवर.
क्रमांक : ११०५२०२१-गड-०३