मूक आंदोलन जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST2021-06-17T04:18:09+5:302021-06-17T04:18:09+5:30

८१ वर्षीय शशिकांत पवार यांचा सहभाग या आंदोलनासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक शशिकांत पवार हे मुंबईहून आले. वय ...

Add silent movement | मूक आंदोलन जोड

मूक आंदोलन जोड

८१ वर्षीय शशिकांत पवार यांचा सहभाग

या आंदोलनासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक शशिकांत पवार हे मुंबईहून आले. वय वर्षे ८१ असूनही ते भरपावसात आंदोलनस्थळी काहीवेळ थांबले. त्यांनी शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा देऊन पुन्हा मुंबईला निघून गेले.

चौकट

बीडच्या दिव्यांग सुरेश मानेची तळमळ

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या तळमळीने बीड येथील दिव्यांग (अंध) सुरेश माने हा युवक या आंदोलनात सहभागी झाला. तो बीड येथून पुण्याला आणि तेथून कोल्हापूरला आला. त्याने हा प्रवास एकट्याने एसटीने केला.

चौकट

नियुक्तीच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

मराठा आरक्षणाअंतर्गत यापूर्वी विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले सुमारे २५० विद्यार्थी, विद्यार्थिनी या मूक आंदोलनात सहभागी झाल्या. त्यांच्यासमवेत महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनीदेखील होत्या. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील सकल मराठा समाजातील समन्वयक, प्रमुख कार्यकर्ते, समाज बांधव, भगिणी या आंदोलनात सहभागी झाल्या.

Web Title: Add silent movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.