जोड... या बातमीसाठी ....आशिष रावराणे जगातील साहसी डकार रॅलीमध्ये उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST2021-01-03T04:25:56+5:302021-01-03T04:25:56+5:30

वडिलांकडे हर्ले डेव्डिडसनची किमती गाडी होती. त्यांच्यामुळे विविध मोटरसायकल्स त्याही विख्यात कंपन्यांच्या चालविण्याची आवड निर्माण झाली. त्यातून हिमालयीन रॅलीसारख्या ...

Add ... for this news .... Ashish Ravrane will be participating in the world's most adventurous Dakar rally | जोड... या बातमीसाठी ....आशिष रावराणे जगातील साहसी डकार रॅलीमध्ये उतरणार

जोड... या बातमीसाठी ....आशिष रावराणे जगातील साहसी डकार रॅलीमध्ये उतरणार

वडिलांकडे हर्ले डेव्डिडसनची किमती गाडी होती. त्यांच्यामुळे विविध मोटरसायकल्स त्याही विख्यात कंपन्यांच्या चालविण्याची आवड निर्माण झाली. त्यातून हिमालयीन रॅलीसारख्या भारतातील खडतर स्पर्धेसाठी सहभागी होण्याची त्याला संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले. त्यातून जो आत्मविश्वास निर्माण झाला, त्यानंतर विविध देशातील अशा खडतर समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी होत गेला. याचदरम्यान त्याला नव्या येणाऱ्या दुचाकींचे विश्लेषक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

जगातील सर्वात साहसी रॅली समजल्या जाणाऱ्या वाळवंट, उष्ण, अतिथंड अशा विविध वातावरणातील डकार रॅलीत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत मोठया किंमतीच्या दुचाकी बनविणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे स्पर्धक सहभागी होतात. माझे संपूर्ण कौशल्य या स्पर्धेसाठी पणाला लावून कोल्हापूरचाच नव्हे तर देशाचा झेंडा पुन्हा एकदा अटकेपार नेणार आहे.

- आशिष रावराणे,

आंतरराष्ट्रीय मोटरसायकलपटू

Web Title: Add ... for this news .... Ashish Ravrane will be participating in the world's most adventurous Dakar rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.