बिनविरोध झाल्यावर प्रत्यक्षात निधीची पूर्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:06+5:302021-07-21T04:18:06+5:30
पेठवडगाव : बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करा निधी देतो, असे जाहीर करून प्रत्यक्षात निधीची पूर्तता करून वचनपूर्ती केली आहे. यापुढे ...

बिनविरोध झाल्यावर प्रत्यक्षात निधीची पूर्तता
पेठवडगाव :
बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करा निधी देतो, असे जाहीर करून प्रत्यक्षात निधीची पूर्तता करून वचनपूर्ती केली आहे. यापुढे मौजे तासगाव विकासाभिमुख गाव व्हावे. यासाठी पाठपुरावा करूया, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले.
मौजे तासगाव (ता. हातकणंगले) येथे सांस्कृतिक सभागृह भूमिपूजन, तसेच विविध कामांचे शुभारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच शिवाजीराव पाटील होते. या वेळी संपतराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष भानुदास पाटील, सरपंच चंद्रकांत गुरव, उपसरपंच पौर्णिमा कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना आवळे यांनी तासगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून विकासाभिमुख आदर्श घातला आहे. पुढेही ग्रामपंचायतीस विकासकामांसाठी निधी देऊ. तासगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आमदार राजू आवळे यांनी विठ्ठल मंदिरासमोर सांस्कृतिक सभागृह, पाच हायमास्ट विद्युत दिवे, अंतर्गत रस्ते क्राॅंक्रीट व पेव्हिंग ब्लाॅक आदी कामे सुरू आहेत. तर वडगाव ते तासगाव काम पूर्ण झाले आहे.
प्रास्ताविक ग्रामपंचायतीचे नेते शिवाजीराव पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन कृष्णात पाटील यांनी केले. ग्रामसेविका एस. एस. दगडे यांनी आभार मानले. या वेळी बाजीराव सातपुते, जनार्दन पाटील, एन. डी. पाटील, नामदेवराव पाटील, तानाजी पाटील, अर्जुन पाटील, अनिल गाडवे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
पेठवडगाव : मौजे तासगाव (ता. हातकणंगले) येथे सांस्कृतिक सभागृह बांधकाम शुभारंभ करताना आमदार राजू आवळे. सोबत शिवाजीराव पाटील, सरपंच चंद्रकांत गुरव, उपसरपंच पौर्णिमा कांबळे, संपतराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष भानुदास पाटील आदी उपस्थित होते.