शिवसेना बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा : संजय पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:28+5:302021-06-20T04:17:28+5:30
कोल्हापूर : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार काेरोनाच्या महामारीतही सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करत ...

शिवसेना बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा : संजय पवार
कोल्हापूर : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार काेरोनाच्या महामारीतही सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करत आहे. सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचवून कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात शिवसेना बळकट करावी, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले.
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोना काळात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांना छत्री वाटप तर सीपीआरमध्ये कोरोना वॉर्डात काम करणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा सत्कारही संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
पवार म्हणाले, राज्यात कोरोना महामारीमध्ये आरोग्य यंत्रणेने खूप चांगले काम केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाच्या लाटा परतवून लावण्यात यश आले. निरपेक्ष बुद्धीने कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे इतक्या आत्मीयतेने रुग्णांची सेवा करून खऱ्या अर्थाने मानवतेची जपणूक आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली.
उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवाजी जाधव, मंजित माने, विशाल देवकुळे, संजय जाधव, शशिकांत बिडकर, रणजित आयरेकर, अवधूत साळोखे, नरेश तुळशीकर, शुभांगी पोवार, स्मिता सावंत, पूजा शिंदे, दीपाली शिंदे, शुभांगी साळोखे, अर्चना डांगे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : शिवसेना जिल्हा कार्यालयाच्या वतीने शनिवारी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, सुरेश साळोखे आदी उपस्थित हाेते. (फोटो-१९०६२०२१-कोल-शिवसेना)