शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते रायगडाकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:04 IST

राज्यभरातून सहा लाखांहून अधिक शिवप्रेमी उपस्थित राहणार

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शुक्रवार, ६ जून रोजी रायगडावरशिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी कोल्हापुरात जय्यत तयारी सुरू आहे. पूर्वतयारीसाठी एकूण चार खासगी बसमधून सुमारे चारशे कार्यकर्ते मंगळवारपर्यंत रायगडावर दाखल झाले आहेत. या सोहळ्याला राज्यभरातून सहा लाखांहून अधिक शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत, असा अंदाज आहे.रायगडावर जाणाऱ्या शिवप्रेमींसाठी कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड, पंढरपूर तसेच कोकणातून एसटी बसची व्यवस्था केलेली आहे. प्रशासनाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तयारी पूर्ण केली आहे. रायगडाच्या पायथ्याला पाचाड येथील जिजामाता यांच्या वाड्याजवळील कवडीचा माळ येथे वाहनतळ उभारले आहे. येथे दोन मोठे वाहनतळ तयार केले आहेत. तेथे बसने शिवप्रेमींना आणून सोडले जाणार आहे.वाहनतळावरून गडाच्या पायथ्यापर्यंत शिवप्रेमींना नेण्यासाठी ३०० एसटी बसची व्यवस्था, पाच ठिकाणी अन्नछत्र उभारले आहे. याशिवाय मंडप उभारणी, ध्वनियंत्रणा, स्नानगृह, स्वच्छतागृहांची मोठी व्यवस्था केली आहे. एमटीडीसीमध्ये महिलांच्या निवासाची सोय केली आहे. शिवभक्त नियंत्रण समितीत काम करण्यास इच्छुक हजारो स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी समितीच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे.ढोलपथक, तुतारी, हलगीवादक जाणाररायगडावरील या सोहळ्यासाठी ढोलपथक, तुतारी, सनई-चौघडे, लेझीम पथक, झांज पथक, हलगीवादक तसेच मर्दानी खेळाचे आखाडे जाणार आहेत. त्याची तयारी सुरू आहे. फुलांच्या सजावटीसाठी फुले घेऊन जाणारे कार्यकर्ते गडावर पोहोचले आहेत.

टी शर्ट, स्टीकर्सची व्यवस्थारायगडावरील या सोहळ्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या-त्या जिल्ह्यातून स्वतंत्र टी शर्ट, झेंडे तसेच स्टीकर्स देण्यात आले आहेत. स्टीकर्समुळे खासगी वाहनातून येणाऱ्या शिवप्रेमींना टोलनाक्यावर अडविले जाणार नाही. टोलशिवाय या कार्यकर्त्यांना गडावर पोहोचणे सोयीचे जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेकRaigadरायगड