DJ लावण्याच्या वादावरून कार्यकर्त्यांनी मांडला ठिय्या; १ तास मिरवणुका खोळंबल्या
By भीमगोंड देसाई | Updated: September 10, 2022 07:06 IST2022-09-10T07:05:31+5:302022-09-10T07:06:50+5:30
मध्यरात्री मिरवणूक रेंगाळली

DJ लावण्याच्या वादावरून कार्यकर्त्यांनी मांडला ठिय्या; १ तास मिरवणुका खोळंबल्या
कोल्हापूर - डीजे लावण्याच्या कारणावरून वाघाची तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाद्वार रोडवरच मध्यरात्री दीड वाजता ठिय्या मारला. त्यामुळे सुमारे एक तासाहून अधिक काळ मिरवणुका रेंगाळल्या. त्याचवेळी गर्दीचा महापूर आल्याने महारोडवर चेंगराचेंगरी आणि ढकला ढकली झाली. त्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.
वाढत असलेला तणाव पाहता घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे स्वतः पापाची तिकटी येथे थांबून मिरवणूक मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न केला. शेवटी रात्री अडीच वाजता गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या.